जयंती कुळकर्णी
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीची मुदत आता जवळ येऊन ठेपली आहे. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे लेखापरीक्षण करणे आवश्यक नाही, अशा सर्व व्यक्तींनी आपले प्राप्तिकर विवरणपत्र ३१ जुलै २०२४ पूर्वी दाखल करणे बंधनकारक आहे.
विवरणपत्र विहित मुदतीत दाखल केल्यामुळे सरकारला कर गोळा करणे आणि लोककल्याणासाठी अधिक खर्च करणे सोपे होते. यासाठी प्रत्येक करदात्याने वेळेत विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. वेळेत विवरणपत्र भरल्यामुळे करदात्यांना दंड, व्याज आदींपासूनही वाचता येते.