Mosquito Bite & Blood Group Relation: सध्या मॅसेच्युसेट्समध्ये डासांनी उच्छाद मांडला आहे. डासांमुळे पसरणाऱ्या एका आजाराच्या भीतीने चक्क मॅसेच्युसेट्समधील काही गावांनी चक्क संध्याकाळी घरातून बाहेर पडू नका, उद्यानात जाऊ नका असं तिथल्या रहिवाशांना सांगितलं आहे.
इतकंच नव्हे तर सार्वजनिक कार्यक्रमांचं वेळापत्रकही बदललं आहे. एकूण तिथल्या सुंदर संध्याकाळी डासांनी काळवंडून गेल्यात म्हणा ना.
याचं कारण आहे, तिथे सापडलेला एका अत्यंत गंभीर आजाराचा रुग्ण. मॅसेच्युसेट्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी इस्टर्न इक्वाइन एन्सेफॅलायटिस विषाणूचा पहिला मानवी रुग्ण सापडल्याचा दावा केलाय.
हा आजार अत्यंत गंभीर असून तो झालेल्या रुग्णांपैकी ३० टक्के मृत्यूमुखी पडतात तर त्यातून वाचलेल्या अनेकांना हा आजार आयुष्यभरासाठी मेंदुसंदर्भात काही ना काही दुखणे देतो म्हणे. तर असा हा कुख्यात आजार पसरतो तो एका विशिष्ट डासामुळे.