बैठी जीवनशैली वाईट, असं म्हणतात ते उगाच नाही. सततचं बैठं काम केल्याने मृत्यूचा धोका वाढतो, असं जर उद्या कोणी सांगितलं तर?हो, हे खरं आहे. त्यामुळेच धूम्रपानाइतकंच सलग ९-१० तास बसून काम करणंसुद्धा शरीरासाठी वाईट आहे. कसं ते जाणून घेऊया..आपल्याला सगळ्यांना माहिती असतं दिवस दिवस खुर्चीत बसून आपण जर काम करत असू तर आपले सगळे फिटनेस प्लॅन टोटल फिसकटतात. म्हणजे सुस्ती येते. वजन वाढतं, त्यातून उगाचच थकवा, कंटाळा येतो. थोडक्यात म्हातारे होण्याची प्रक्रिया अधिक जलद होतेय असं वाटतं..अगदी सततचं बैठं काम म्हणजे धूम्रपान करण्याइतकं वाईट आहे, असंच म्हणणार नाही पण तसंच काहीसं म्हणता येईल. कसं ते समजून घेऊ. बसून राहणं म्हणजे खरंतर अधिक वेगाने म्हातारं होणं, असं म्हणतायत केटी बोनम. केटी या बायोमेकॅनिस्ट आहेत आणि “My Perfect Movement Plan.” या पुस्तकाच्या लेखक आहेत.केटी म्हणतात, तुमची हाडं असतील अथवा स्नायू, सांधे किंवा तुमची उर्जा... या सगळ्या गोष्टींवर तुमच्या बसून राहण्याचा कुठे ना कुठे परिणाम होत असतो आणि हा परिणाम काही फारसा चांगला नसतो.न्युयॉर्क टाइम्सच्या एका लेखात केटींनी हे मत मांडलं आहे..आता आपण सगळेच बसून काम करत असतो. म्हणजे शहरातली जवळपास ८०-९० टक्के नागरिक बैठं काम करतात असं म्हणता येईल. अगदी नऊ ते दहा तासांपर्यंत बसून काम करत असतो. कामाच्या वेळानंतर मोठ्या शहरातली अनेक माणसं प्रवासात बसून असतात. कुणी ट्रेनमध्ये, कुणी बसमध्ये, कुणी टॅक्सीत तर कुणी मोटरबाईकवर. एकूण आपला बसून राहण्याचा काळ वाढत राहतो..असं बसून राहणं चांगलं का?तर नव्हेच. याचे परिणाम वाईटच आहेत.न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखात त्यांनी एका अभ्यासाविषयी सांगितलं आहे, 2024च्या सुरुवातीला झालेल्या एका तैवानमध्ये एक अभ्यास झाला. त्यात 4,80,000 व्यक्तींचा समावेश होता. या सगळ्या व्यक्ती 13वर्षाच्या वरील होत्या. त्यातल्या ज्या व्यक्ती दिवसभरात बैठं काम करत होत्या त्यांना हृदयविकारातून उद्भवणाऱ्या आजारांचा धोका इतरांपेक्षा 34 टक्के अधिक होता. एकूणच आकडेवारी काढायची झाली तर इतर सगळ्यांपेक्षा त्यांना मृत्यूचा धोका 16 टक्के जास्त होता. .US Citizenship: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतीयांचं ‘अमेरिकन ड्रीम’ भंगणार?.मग करायचं काय?हा मरणाचा धोका जर कमी करायचा तर तुमच्या दिनचर्येत 15 to 30 मिनीटांच्या शारीरिक हालचालींचा समावेश करणे. काही अभ्यासक तर असं म्हणतात की ज्यांचं काम बैठं आहे, त्यांनी इतरांच्या दुप्पट व्यायाम करायला हवा आहे.शेवटी काय अतिप्रमाणात बैठं काम हे नव्या मृत्यूघंटेचं नाव आहे. नेव्हिल ओवेन हे ऑस्ट्रेलियातल्या बेकर हार्ट आणि डायबेटिस इन्स्टिट्यूट, मेलबर्नमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. ते म्हणतात, सततचं बैठं काम ही नव्या युगातली नवी आरोग्य समस्या आहे. .पण मुळात बसणं एवढं वाईट आहे का?बसणं वाईट नाही तर सलग बराच काळ कोणत्याही हालचालीशिवाय बसून राहणं वाईट आहे. नुसतं बसून राहणं, तुमच्या हद्यासाठी चांगलं नाही. इतकंच नव्हे तर तुमचे सांधे, स्नायू, चयापचय क्रिया आणि मानसिक आरोग्य सगळ्यासाठीच ते वाईट असतं. अमेरिकन हार्ट असोसिएशनने असं म्हटलंय की, दीर्घकाळ बैठं काम केल्याने हृदयविकार किंवा झटका होण्याचा धोका वाढतो. अगदी तुम्ही नियमित व्यायाम करत असलात तरीही. तुम्ही 30 मिनिटं सलग बसून राहिला तर तुमच्या रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो. जितका जास्त वेळ बसाल तितकं ते हृदय व रक्तवाहिन्यांना हानीकारक असतं. विशेषत: 10 तासांपेक्षा जास्त बसलेले असाल तर नक्कीच..दीर्घकाळ बसण्याने कंबरेची दुखणी वाढतात. काही अभ्यासांनुसार सतत चार तास बसून राहिल्याने तुमच्या लंबर डिस्कची लांबीही आकुंचन पावते. आपल्या मणक्याच्या कशेरुकामध्ये पाच चकत्या असत्यात. गाडीला जसे धक्के बसू नयेत म्हणून यंत्रणा असते त्याप्रमाणे shock absorber सारखं काम त्या करतात. त्यासोबतच मणक्याच्या खाली येणारा भार सहन करून, मणक्यांची हालचाल अधिक सुलभ व्हावी, यासाठी मदत करतात. तर या लंबर डिस्कला बैठं काम मारकच आहे. .त्यामुळेच दर तासाला काहीतरी हालचाल करावी. या हालचालीत संपूर्ण शरीर अथवा, शरीराच्या वरच्या अथवा खालच्या भागात तरी थोडीफार हालचाल झाली पाहिजे.त्याहूनही उत्तम म्हणजे, दर तासाला दोन ते पाच मिनिटे चालणे किंवा पायऱ्यांवर वरखाली करणं. मात्र ही हालचाल झटपट करायला हवी. जेणेकरून हृदयाची गती वाढायला हवी..स्टँडिंग डेस्क उपयोगाचे नाहीतबसून काम करणं योग्य नाही म्हणून काही ठिकाणी स्टँडिंग डेस्क आणले होते. म्हणजे उभ्याने काम करायचं, खुर्च्यांना नो एंट्री. पण यामुळे पाय दुखतात. त्यामुळेच नुसतं डेस्क बदलून उपयोग नाही. तर काही वेळाच्या अंतराने शरीराची हालचाल हाच यावर उपाय आहे. .कधीकधी आपला अगदीच नाईलाज होतो. .त्यावेळी बराच काळ बसून राहण्याविना पर्याय नसतो. उदा. लांबच्या कारच्या प्रवासाला. आता तिथे कदाचित तुम्हाला फार हालचाल करता येणार नाही पण बसण्याची पद्धत नक्कीच बदलता येईल. १५-३० मिनीटांनी पाय हलवून घ्या. थोडी बसण्याची पद्धत बदला. हालचाल करा. पाय, पावलं हलवा. पाय हलवा, कंबर, कणा याच्या स्थितीत बदल करा..नुसतं ऑफिसात असतानाही काही कामं उभ्या उभ्या किंवा चालता चालता होऊ शकतात. उदा. स्क्रीनवरचं काही वाचायचं असेल किंवा एखाद्या सेशनमध्ये काही ऐकायचं असेल तर तुम्ही हेडफोन लावून चालत ते सेशन ऐकू शकता.फोनवरचं एखादं संभाषण चालताना करू शकता.मध्येच थोडं उठून डेस्कच्या बाजूला जा. आळस दिल्याप्रमाणे दोन्ही हात डोक्यामागून वर न्या मग डाव्या-उजव्या बाजूला ते थोडेसे ताणा. थोडं शरीर मोकळं होईल.जर ३० मिनीटं बसून काम करणार असाल तर पुढची ३० मिनीटं उभ्याने काम करा..काहीही असो पण चांगलं आरोग्य टिकवायचं असेल तर खुर्ची सोडाच!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.