भूषण महाजन, kreatwealth@gmail.com
गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी मुहूर्ताच्या व्यवहारात शेअर बाजारात जी दिवाळी सुरु झाली, ती २०२४ ची दिवाळी जवळ आली तरी संपलीच नाही. शेअर बाजाराला लाभलेले म्युच्यअल फंड - ‘एसआयपी’चे पेट्रोल संपण्याचे नावच नाही.
११ ऑक्टोबरला शेअर बाजार जरी अडखळत बंद झाला असला तरी ‘निफ्टी’ होता २४,९६४ अंशांवर. म्हणजे २७ सप्टेंबर रोजी नोंदविलेल्या सर्वोच्च पातळीच्या (२६,२७७ अंश) पाच टक्के खाली आला. गेल्या दिवाळीत तो होता १९,५२५ अंशांवर!
गेल्या ११ महिन्यांत, जवळजवळ २८ टक्के वर! तरी पण पुढच्या दिवाळीपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात हीच तेजी टिकेल का, हा प्रश्न भेडसावतोच!