Akshayya Tritiya घर खरेदी करण्यापूर्वी सगळ्या बाबी घ्या तपासून

आपल्या भविष्याची तरतूद म्हणून बाजूला ठेवलेली रक्कम स्थावर मालमत्तेत गुंतवल्यास भविष्यात त्याचा चांगला परतावा मिळतो. त्यामुळे फ्लॅट असो किंवा जमीन सखोल चौकशी आणि विश्‍वासाहर्ता यांच्या जोरावर नव्या वर्षात गुंतवणूक नक्कीच केली जाऊ शकते.
home buying tips
home buying tipsEsakal
Updated on

Home Buying Tips: मांगल्याचा आणि आनंदाचा हा दिवस आपल्या हक्काचे घर खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त असतो. येत्या अक्षयतृतियेला Akshayya Tritiya आपल्या हक्काचे घर खरेदी करण्याचा विचार करत असताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. Home Buying on the occassion of Akshayya Tritiya

सणा सुदीच्या काळात विकसक Developer देखील अनेकविध योजना, सवलतीच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात. मात्र घर खरेदी Home Buying करणाऱ्या ग्राहकांनी चोखंदळ व सजगपणाने त्या सवलती व योजनांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक ठरते.  

प्रकल्पाचा मास्टर प्लॅन, निवासी क्षेत्र Residential Zone आहे की नाही, वीज आणि पाणी यांची कायदेशीर व्यवस्था तसेच बांधकामाला दिलेले प्रमाणपत्र नक्कीच तपासून पाहा...

अर्थात विकसकाची ही सर्व कागदपत्रे आता आपल्याला रेराच्या MahaRera संकेतस्थळावर, संबंधीत प्रकल्पांच्या रेरा क्रमांकावर निश्चितपणे शोधता व तपासता येतील.. प्रकल्पासंबंधातील कागदपत्रे क्लिअर असतील तरच बँका कर्ज मंजुरी देतात. त्यामुळे आपण घेत असलेल्या घरासाठी कोणती बँक कर्ज देतेय हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

सध्या बँकांच्या व्याजाचे दर आवाक्यात आहेत. शासनाने फ्लॅटसची उभारणी करताना पर्यावरणाचे काही नियम पाळणे बंधनकारक केले आहे. त्याअनुषंगाने विकसक पर्यावरणपूरक बांधकाम करतातही. सौर दिवे, सौर गिझर तसेच कचरा व्यवस्थापनाच्या सोयी तसेच रेन वॉटर हार्वेस्टींग अशा सुविधा विकसक सुविधा म्हणून उपलब्ध करून देत असतात.

काही ठिकाणी स्वयंपाकघरातील पाण्याचे पुनर्वापर करण्याची सोय विकसकाने केलेली असते. घराच्या खर्चात या सर्वांची किंमत गृहित धरलेली असतेच. त्यामुळे जेव्हा आपण कर्ज घेऊन घर घेतो तेव्हा या सर्व खर्चांचा विचार करुन नियोजन करायला हवे. 

हे देखिल वाचा-

home buying tips
Home Buying Tips : पत्नीच्या नावे घर घेणं, किधीही फायद्याचंच ठरतं, कसं ते वाचा

तसेच हल्ली जुन्या इमारतीचा पुनर्विकास Re-Development केला जातो. त्यावेळी तिथे नव्याने काही फ्लॅट्स तयार होतात. अशा इमारतीतही विकसकाकडून फ्लॅट विकत घेता येऊ शकतो. अर्थात पुनर्विकसित इमारतीत फ्लॅट मिळण्यास निश्‍चित कालमर्यादा काय याचा विचार करुनच गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

प्रत्येक वेळी रहायला जायचे असे ठरवून फ्लॅट घेतो असे नाही. आज सोन्यानंतर जमीन ही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम साधन असल्याने सेकंड होम म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. पैशाची गुंतवणूक करण्यासाठी घर किंवा जमीन यांसारख्या स्थावर मालमत्ता विचार केला जातो. त्यामुळे अगदी सामान्य माणूसही पैसे साठवून कर्ज काढून आपल्या पुढच्या पिढीसाठी जागा घेण्याचा विचार करण्याचा कल वाढतो आहे. 

home buying tips
Home Buying विकसकांकडून सवलती आणि आटोक्यातले व्याजदर...करा विचार घर घेण्याचा

बँकांचे व्याजदर कमी झाल्याने यंदा घर घेण्याचा विचार पक्का करण्यासाठी चांगली वेळ आहे.  फ्लॅट सारखाच विचार मोकळी जागा घेतानाही करायला हवा. थोडक्यात स्वप्नातील घर असो किंवा गुंतवणुकीसाठी घेतलेले घर असो त्यासाठी काही गोष्टी सुस्पष्ट झाल्याशिवाय व्यवहार करणे कदाचित चुकीचा निर्णय ठरू शकतो.

आपल्या भविष्याची तरतूद म्हणून बाजूला ठेवलेली रक्कम स्थावर मालमत्तेत गुंतवल्यास भविष्यात त्याचा चांगला परतावा मिळतो. त्यामुळे फ्लॅट असो किंवा जमीन सखोल चौकशी आणि विश्‍वासाहर्ता यांच्या जोरावर नव्या वर्षात गुंतवणूक नक्कीच केली जाऊ शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.