Loan Foreclosure Charge : कधी लागतो फोरक्लोजर चार्ज, कर्ज घेताना या गोष्टी ठेवा ध्यानात, होईल फायदा

पर्सनल लोन, गाडीचं किंवा घरासाठी घेतलेलं कर्ज असो हे कर्ज आपण कर्जाच्या ठराविक अवधीपूर्वी फेडू शकतो. अवधीपूर्वीच कर्ज फेडायचं असल्यास त्याला फोरक्लोजर (Loan Foreclosure) म्हटलं जातं
लोनची मुदतपूर्व परतफेड करताना
लोनची मुदतपूर्व परतफेड करतानाEsakal
Updated on

गेल्या काही वर्षांमध्ये बँकेतून Loan म्हणजेच कर्ज घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे. अगदी काही मोजक्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध होतं. अलिकडे तर केवळ २-३ कागदपत्रांच्या आधारावर काही तासांमध्ये किंवा एका दिवसातच कर्ज मिळतं. कर्जाची ही प्रक्रिया सोपी झाल्यामुळे गेल्या २-३ वर्षात भारतात India कर्ज घेणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. Finance Tips in Marathi Read This before foreclosure of your Loans

एकेकाळी केवळ घरातील मुलीचं लग्न किंवा घरासाठी कर्ज घेतलं जातं. मात्र अलिकडे तर फोर व्हिलर, बाईक अगदी मोबाईल आणि लॅपटॉप तसचं छोट्या मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी देखील कर्ज Loan घेतलं जातं. कर्ज घेतना साधारण प्रत्येकजणच बँकेचा Interest rate म्हणजे व्याजदर काय आहे हे तपासतो. मात्र कर्ज घेताना काही इतर गोष्टींकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. 

काय आहे फ्लोरक्लोजर चार्ज

कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी झाल्यामुळे अनेकजण तात्पुरत्या एखाद्या अडचणीसाठी त्वरित कर्ज काढतात. काही महिन्यातच परतफेड करण्याच्या या उद्देशाने हे कर्ज काढलं जातं. बँक साधारण कोणतही कर्ज देताना ते ३-५ किंवा त्याहून जास्त अवधिसाठी देते. मात्र जेव्हा आपण हे कर्ज लवकर फेडण्यासाठी जातो तेव्हा बँकेकडून फोरक्लोजर चार्ज Loan Foreclosure लावला जातो. 

पर्सनल लोन, गाडीचं किंवा घरासाठी घेतलेलं कर्ज असो हे कर्ज आपण कर्जाच्या ठराविक अवधीपूर्वी फेडू शकतो. अवधीपूर्वीच कर्ज फेडायचं असल्यास त्याला फोरक्लोजर (Loan Foreclosure) म्हटलं जातं. प्रत्येक बँकेचे हे चार्जेस वेगवेगळे असू शकता. मात्र प्रत्येक ग्राहकाला हे चार्जेस देण्याची गरज नसते. तुम्हालाही फोरक्लोजर चार्ज वाचवायचा असले तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

जेव्हा कर्जदार ठरलेल्या कर्जाच्या अवधिपूर्वीच सूंपूर्ण रक्कम फेडून कर्ज संपवू इच्छतो तेव्हा बँकेचं नुकसान होत असल्याने ते कर्जदाराकडून नुकसान भरपाईच्या रुपात फोरक्लोजर चार्ज घेतात. उरलेल्या प्रिन्सिपलच्या  ५ ते ७ टक्क्यांपर्यंत हा चार्ज असू शकतो. प्रत्येक बँकेचा फोरक्लोजर चार्ज वेगवेगळा असतो.  शिवाय यावर GST देखील लागू शकते. यासाठी कर्ज घेतानाच या फोरक्लोजर चार्जची माहिती घेणंदेखील गरजेचं आहे. 

हे देखिल वाचा-

लोनची मुदतपूर्व परतफेड करताना
Home Loan : गृहकर्जाचे हप्ते आणि व्याज कमी कसे कराल ?

लॉकिंग पीरिएड

अनेक बँकांमध्ये कर्ज घेताना लॉकिंग पिरिएड असतो. म्हणजेच कर्ज घेतल्यानंतर ठराविक महिन्यांच्या आता तुम्ही लोन क्लोज करू शकत नाही. काह काळ ६ महिने ९ महिने तसचं मोठ्या कालावधीच्या कर्जात ३-५ वर्ष देखील असू शकतो. त्यामुळेच कर्ज घेताना जर भविष्यात तुम्हाला ते लवकर फेडायचं असेल तर या लॉकिंग पीरिएडची देखील माहिती करून घ्या. 

तुम्ही लॉकिंग पीरिएडनंतरही कर्ज लवकर फेडत असाल तरिही तुम्हाला फोरक्लोजर चार्ज लागू शकतो. 

कुणाला भरावा लागत नाही फोलक्लोजर चार्ज

तुम्ही गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज किंवा इतर कोणतही कर्ज घेतलं असेल तरी लवकर कर्ज फेडण्यासाठी फोरक्लोजर चार्ज हा भरावाच लागतो. मात्र जर तुम्ही फ्लोटिंग इंटरेस्टवर लोन घेतलं असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, जर तुम्ही फ्लोटिंग व्याजावर कर्ज घेतले असेल आणि वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करत असाल, तर तुम्हाला फोरक्लोजर चार्ज भरावा लागणार नाही.

मात्र फिक्स्ड इंटरेस्ट रेटवर घेतलेलं कर्ज वेळेआधी फेडताना हा चार्ज स्विकारला जातो. 

कसा कळेल फोलक्लोजर चार्ज

जेव्हा तुम्ही बँकेत कर्जासाठी अप्लाय करता तेव्हा तुमचं कर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेकडून एक सँक्शन लेटर दिलं जातं. यामध्ये बँकेच्या आणि कर्जाच्या अटी आणि नियमांची माहिती दिलेली असते. यामध्येच फोरक्लोजर चार्ज किती कोणत्या काळासाठी किती भरावा लागेल याची माहिती नमूद केलेली असते. सँक्शन लेटरमध्ये फोरक्लोजरची माहिती उपलब्ध नसल्यास तुम्ही बँक मेनेजरकडून त्याबद्दलची माहिती मिळवू शकता. 

फोरक्लोजर चार्ज माहिती झाल्यानंतर तुम्ही बँक मॅनेजर किंवा लोन मॅनजरशी हा दर कमी करण्यासंदर्भात विनंती करू शकता. अर्थात तुमचं कर्ज आणि तुमचा सिबिल स्कोर तसंच बँकेच्या पॉलिसीवर हा दर कमी करणं किंवा तो किती टक्क्यांपर्यंत कमी होईल हे अवलंबून असतं. 

फोरक्लोजर चार्जेस कमी असल्यास वेळेआधीस लोन फेडल्याने तुमची बचत होवू शकते. यामुळे कर्जावरील तुमची व्याजाची रक्कम वाचू शकते. तसचं तुमचा सिबिल रेकॉर्ड चांगला राहतो. मात्र हे कर्ज वेळेआधीच बंद करण्यापूर्वी फोरक्लोजर चार्जेस आणि तुमची वाचणारी व्याजाची रक्कम याची गोळाबेरीज करणं गरजेचं आहे. अन्यथा पैसे वाचवण्याएवजी तुमचं नुकसान होवू शकतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.