Home Buying Tips : पत्नीच्या नावे घर घेणं, किधीही फायद्याचंच ठरतं, कसं ते वाचा

Home Buying Tips : पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतल्याने पत्नीला खूष करता येते.
Home Buying Tips
Home Buying Tips
Updated on

 Home Buying Tips : पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतल्याने पत्नीला खूष करता येते. ती अभिमानाने सगळ्यांना सांगत सुटते त्यातही तुमचंच कौतुक होत असतं. घर घेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी अनेक वर्ष एक स्त्री भक्कमपणे सांभाळत असते. तिला अपेक्षा नसते की तुम्ही घर तिच्या नावावर केलंय की नाही. ती ते पहिल्या दिवसापासून आपलं समजून काम करत असते.

 अनेक राज्य सरकारे त्यांच्या सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून महिला ग्राहकांना स्टॅम्पड्युटीमध्ये सवलत देतात. जसे की दिल्लीमध्ये पुरुषांसाठी स्टॅम्पड्युटी ६ टक्के आहे, तर महिलांसाठी ४ टक्के. मालमत्ता पत्नीला भेट दिली तरीही हा लाभ मिळतो. महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे.

त्यामुळेच मालमत्ता करात सूट आणि आर्थिक लाभासाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र शासनाच्या या लाभदायक योजनांचा एवढा विस्तार होऊनही बहुतांश महिलांना त्यांची माहिती नाही. महिलांना आर्थिक आघाडीवर मजबूत करण्यासाठी कोणत्या सुविधा दिल्या आहेत.

Home Buying Tips
Gold Buying Tips : सोनं खरेदी करताना या ५ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर भोगावं लागेल मोठ नुकसान...

पतीच्या नावे अगोदरच अनेक मालमत्ता असल्यास पत्नीच्या नावे एखादी मालमत्ता घेणे वेल्थ टॅक्सच्या दृष्टीने सोयीचे होते. मालमत्तेची मालकी असलेल्या जोडीदाराची संबंधित मालमत्ता म्हणजे निव्वळ मालमत्ता गृहित धरली जाते. या सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी केवळ पत्नीच्या नावे मालमत्ता करून देणे पुरेसे होत नाही.

तिच्या नावे केलेल्या मालमत्तेतून मिळालेले प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उत्पन्न पतीच्या उत्पन्नात मिळवले जाते. याचाच अर्थ असा की, पतीने पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी केली, पण त्यामध्ये पत्नीचे आर्थिक योगदान नसले तर या मालमत्तेतून मिळणारे भाडेरूपी उत्पन्न पतीचे उत्तन्न म्हणून गृहित धरले जाईल.

 पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतल्याने किंवा स्त्रियांना मालकी हक्क दिल्याने आर्थिक आणि कौटुंबिक संतुलनही वाढते. गेल्या काही वर्षांत महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

Home Buying Tips
Buy Home : घर खरेदीदारांना सणांनिमित्त सवलत

कमी व्याजावर गृहकर्ज तुम्हाला घर घ्यायचे असेल तर बहुतेक लोक कर्ज घेतात. गृहकर्ज घेतल्यानंतर ग्राहक बँकेला जी रक्कम देतो, त्यात व्याजदर आणि मूळ रक्कम समाविष्ट असते, ज्याला समान मासिक हप्ता किंवा ईएमआय म्हणतात.

गृहनिर्माण वित्त संस्था पुरुषांच्या तुलनेत महिलांना व्याजदरात सवलत देतात. काही गृहनिर्माण फायनान्स कंपन्यांनी महिलांसाठी त्यांच्या उद्देशानुसार आणि उत्पन्नानुसार विशेष कर्ज योजनाही तयार केल्या आहेत. व्याजदर कमी असल्याने पत्नीच्या नावावर घर घेणे हा फायदेशीर व्यवहार आहे.

Home Buying Tips
Buy Home :महारेराकडून सुरक्षित घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुद्रांक शुल्कात सूट

अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावावर मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्कात सूट दिली जाते. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये, महिला आणि पुरुषांसाठी नोंदणी शुल्काचा दर पुरुषांसाठी निर्धारित केलेल्या नोंदणी शुल्काच्या दरापेक्षा सुमारे दोन ते तीन टक्के कमी आहे. त्यामुळे जर एखाद्या महिलेने स्वतःच्या नावावर मालमत्ता नोंदवली तर मुद्रांक शुल्कातही सूट मिळते.

राजधानी दिल्लीत पुरुषांना 6 टक्के दराने मुद्रांक शुल्क भरावे लागते, तर महिलांना 2 टक्के सवलत मिळते. म्हणजेच त्यांना केवळ 4 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते.

Home Buying Tips
Buying Home vs Rent: घर विकत घ्यावं की भाड्यानं; कसा होईल तूम्हाला लाखोंचा फायदा!

पत्नीची आर्थिक सुरक्षा

जर एखाद्या महिलेकडे मालमत्तेची मालकी असेल तर ती तिची आर्थिक सुरक्षा मजबूत करते आणि तिला स्वावलंबी बनवते. या संपत्तीवर तिचा अधिकार असल्याने ती पूर्ण स्वातंत्र्याने कोणताही निर्णय घेऊ शकते. मग नवरा, मुलं किंवा कुटुंबातील इतर सदस्य सहमत असोत की नसो.

ती स्वेच्छेने मालमत्ता खरेदी, विक्री किंवा भाड्याने घेण्याचा निर्णय घेऊ शकते. मालमत्ता करात सूट महिलांना मालमत्ता संबंधित करातही सूट मिळते. महापालिकेने महिलांना ही सूट दिली आहे. मात्र, ती मालमत्ता महिलेच्या नावावर असेल तरच तुम्हाला कर लाभ मिळू शकतो.

Home Buying Tips
Buying Home vs Rent: घर विकत घ्यावं की भाड्यानं; कसा होईल तूम्हाला लाखोंचा फायदा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()