Rules For Property Documents : जमिनीची कागदपत्रे गहाळ झाली तर काय करावं?

कागदपत्रे गहाळ झाल्यावर लोक तुमच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू शकतात
Rules For Property Documents
Rules For Property Documents esakal
Updated on

Rules For Property Documents : जमिनीची कागदपत्रे ही मालमत्तेच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारात खुप महत्वाची भूमिका बजावतात. गहाळ कागदासह मालमत्ता विकणं हे सोपं काम नाही. जमिनीची कागदपत्रे ही तुमची सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आहेत.

मालमत्तेची कागदपत्रे नसणे तुम्हाला खूप अडचणीत टाकू शकते. जी मालमत्ता वर्षानुवर्षे तुमची मालमत्ता आहे, तुमचे घर आहे, ती तुमची मालमत्ता असल्याचा कोणताही पुरावा नसणे हा मोठा धक्का आहे. 

जमिनीच्या मालमत्तेच्या बाबतीत प्रत्येकजण अतिशय सावध असतो. पण असे असूनही काही वेळा काही अडचणी निर्माण होतात. मालमत्तेची कागदपत्रे ठेवण्यासाठी लोक बँक लॉकरचा ही आधार घेतात. ही कागदपत्रे देखील महत्वाची आहेत कारण त्याशिवाय आपण भविष्यात आपली मालमत्ता विकू शकणार नाही.

या कागदपत्रांवरून तुम्हीच या मालमत्तेचे खरे मालक आहात आणि त्यावर तुमचा कायदेशीर हक्क आहे, हे दिसून येते. जर ही कागदपत्रे कुठेतरी हरवली असतील किंवा आपण ती कुठेतरी ठेवायला विसरलात तर त्याचा फायदा घेऊन तुमच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न दुसराही करू शकतो.

Rules For Property Documents
Surrender Document After Death: मृत्यूनंतर तुमच्या आधार, पॅनकार्डचा कोणी गैरवापर केला तर?

अशा परिस्थितीत काही कारणास्तव मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर काय करावे? तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे कुठे हरवली असतील तर काळजी करण्याची गरज नाही.

गुन्हा नोंदवा

तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करावा लागेल. तुमची कागदपत्रे कुठेतरी हरवली आहेत, हे सांगावे लागते. तुमच्याकडून गहाळ झाली आहेत हे सांगावे लागेल. एफआयआर दाखल केल्यानंतर त्याची प्रतही सोबत ठेवावी लागणार आहे. शक्य असल्यास नोंदणी महानिरीक्षक किंवा उपनिबंधकांना ही माहिती लेखी स्वरूपातही देऊ शकता.  

वर्तमानपत्रात जाहीरात द्या

एकदा तुम्ही एफआयआर दाखल केल्यानंतर तुम्हाला मालमत्तेची कागदपत्रे हरवल्याबद्दल कोणत्याही प्रादेशिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल. जाहिरातीत तुमच्या संपर्कांची माहिती आणि मालमत्तेचा तपशील टाका. जेणे करुन कोणाला आढळल्यास ते तुम्हाला आणून देतील.  

हमीपत्र तयार करा

प्रॉपर्टी पेपरसाठी स्टॅम्प पेपरवर एक हमीपत्र तयार करा, ज्यामध्ये मालमत्तेची संपूर्ण माहिती असेल.. त्यात हरवलेली कागदपत्रे, एफआयआर आणि वृत्तपत्रांच्या नोटिसांचा उल्लेख असावा.   या प्रतिज्ञापत्राची नोंदणी नोटरीकडे करावी लागणार आहे. त्यानंतर तो निबंधक कार्यालयात सादर करावा लागतो. जर तुम्ही हाऊसिंग सोसायटीत राहत असाल तर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन किंवा आरडब्ल्यूएकडून डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळवू शकता.

बँकेतून पेपर गहाळ झाल्यास

जर तुमची कागदपत्रे बँकेत जमा झाली असतील आणि तेथून हरवले (paper is missing from the bank)असतील, तर तुमची प्रॉपर्टी डीड डुप्लिकेट करून घेण्यासाठी संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी पूर्णपणे बँकेची आहे. तुम्ही बँकेकडून नुकसानभरपाईचा दावा करू शकता. तुमची ओळखपत्रे जतन करणे हे बँकेचं कर्तव्य आहे आणि निष्काळजीपणासाठी त्यांना दंड देखील होऊ शकतो. 

डुप्लिकेट कागदपत्रांसाठी अर्ज

आता आपल्या मालमत्तेच्या डुप्लिकेट कागदपत्रांसाठी रजिस्ट्रार कार्यालयात डुप्लिकेट विक्री करारासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी एफआयआरची छायाप्रत, वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीची प्रत, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट आणि नोटरी-अटेस्टेड हमीपत्र आणि काही प्रोसेसिंग फी निबंधक कार्यालयात सादर करावी लागेल. यानंतर तुमच्या नावाने डुप्लिकेट सेल डीड जारी केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.