Smart Homes : बदलत्या काळाचा ट्रेंड

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्मार्ट होम्सचे प्रमाण कमी आहे
Homes
Homes sakal
Updated on

स्मार्ट होम्स : बदलत्या काळाचा ट्रेंड बदलत्या काळानुसार घरांचे स्वरुप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या आगमनाने माणसाचे शारीरिक कष्ट कमी होण्यास मदत तर झालीच, पण आता हे तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, तुमच्या एका हाके वर तुमच्या घरातली सगळी कामे आपोआप पार पडतात.

जेव्हा आपण नव्या घराचं इंटिरिअर डिझाईन ठरवतो किंवा राहते घर अपग्रेड करु पाहतो, तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो. उदाहरणार्थ, घराला रंग कोणता द्यायचा, फर्निचर कसे असेल, रुम्स कशा सजवायच्या वगैरे वगैरे. या आधुनिक काळात घराचे सौंदर्य खुलवत ते अधिक अप-टू-डेट करण्यासाठी आवश्यक असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर.

स्मार्ट होम म्हणजे काय?

स्मार्ट होम म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असे घर! या घरात आपल्या वेगवेगळ्या गरजांसाठी स्मार्ट रीतीने तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. यामध्ये लायटिंग, थर्मोस्टॅट्स, एसी, टीव्ही, सीसीटीव्ही व इतर सुरक्षा व्यवस्था किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं एकाच ठिकाणाहून कंट्रोल करता येतात.

बदलत्या काळाची गरज

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्मार्ट होम्सचे प्रमाण कमी आहे. मात्र, आता गेल्या काही वर्षात ही संकल्पना देशात हळूहळू रुजत चालली आहे. कोरोना संकटानंतर अनेकांनी या स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करायला सुरुवात केली आहे.

तंत्रज्ञानाचा वापर अनावश्यक आणि खर्चिक आहे, असा पूर्वी असलेला समज आता दूर होऊ लागला आहे. याऊलट, स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वापराने घरातली बरीचशी कामे आपल्या नजरेआड तरीही सुरळितपणे पार पडतात. स्मार्ट होम्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपकरणांच्या सुनियोजित वापरामुळे वीजेची बचत होऊन खर्चही कमी होतो.

स्मार्ट होमसाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आता परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. यामुळेच, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. जरी तुम्हाला एकाचवेळी संपूर्ण घर ऑटोमेट करणे शक्य नसले, तरी तुम्ही टप्प्याटप्प्याने हे साध्य करू शकता. सध्या बाजारात स्मार्ट तंत्रज्ञानाची थक्क करणारी रेंज उपलब्ध आहे. तुमची गरज आणि बजेटनुसार तुम्ही त्याची निवड करू शकता.

संपूर्ण घराचा रिमोट कं ट्रोल

घरातील वेगवेगळ्या प्रकारची अद्ययावत उपकरणे सुलभ रीतीने नियंत्रित करण्यासाठी एक मध्यवर्ती यंत्रणा आवश्यक आहे. ती तुम्हाला स्मार्ट हबच्या रुपाने मिळते. मोबाईल अ‍ॅप किंवा व्हॉईस कमांड्सद्वारे या हबमार्फत तुमच्या घरातील सर्व उपकरणांना सूचना देता येतात.

अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आजकाल स्वतंत्र स्मार्टफोन अप‍ॅ्सही उपलब्ध असतात. मात्र, वेगवेगळ्या स्वरुपाची उपकरणे एकाचवेळी हाताळण्यासाठी स्मार्ट हब अधिक सोयीस्कर ठरते. घरात कोणकोणती उपकरणे वापरणार आहात, त्या अप‍ॅ्सना अनुसरुन स्मार्ट हबची निवड होणे गरजेचे आहे.

वीजबचतीलाही फायदेशीर

स्मार्ट होम तंत्रज्ञानात स्मार्ट प्लग हा प्रकार अतिशय अफोर्डेबल आहे. हे प्लग तुमच्या घरातील उपकरणांचे स्मार्टनियमन करण्यास मदत करते. हे प्लग स्मार्टफोनवरुनही कंट्रोल करता येतात. यामुळे, जेव्हा आपण प्रत्यक्ष घरात नसू तेव्हाही आपण उपकरणे गरजेनुसार चालू-बंद करू शकतो.

यामुळे, वीजेचाही वापर सुयोग्य रीतीने होऊन बचत होण्यास मदत होते. आजकाल स्मार्ट स्विचेसच्या साहाय्याने घरातील दिव्यांचा प्रकाश, फॅनचा स्पीड इत्यादी गोष्टी कमी-जास्त करता येतात. त्याचप्रमाणे, पडदेही स्वयंचलित करण्याची सोय उपलब्ध आहे. आपण ॲप किंवा व्हॉईस कमांडद्वारे ते बदलत्या काळानुसार घरांचे स्वरुप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे.

तंत्रज्ञानाच्या आगमनाने माणसाचे शारीरिक कष्ट कमी होण्यास मदत तर झालीच, पण आता हे तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, तुमच्या एका हाके वर तुमच्या घरातली सगळी कामे आपोआप पार पडतात. बंद करू शकतो किंवा उघडू शकतो. संपूर्ण घरासह विविध उपकरणांचे तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅट्सचा वापर होतो. अद्याप भारतीय घरांमध्ये थर्मोस्टॅटचा वापर तुलनेने कमी प्रमाणात आढळतो.

उत्कृष्ट वातावरणनिर्मितीसाठी

घरात एखादं मंगल कार्य असेल तर तुम्ही त्यानुसार वार्म/फ्रेश फील देणाऱ्या रंगांचे लाईट्स छान वाटतात. याऊलट, जर घरात पार्टी असेल तर ब्राईट दिवे छान वाटतील. स्मार्ट लायटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही घरात वेगवेगळ्या प्रकारचे मूड्स सेट करु शकता. हल्ली विविध प्रकारचे स्मार्ट बल्ब उपलब्ध आहेत. रिमोट कंट्रोल किंवा व्हॉईस कंट्रोलद्वारे ते नियंत्रित करता येतात.

सुरक्षिततेची हमी

घराच्या सुरक्षिततेची खात्री करुन घेण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे स्मार्ट लॉक्स! या लॉक्सच्या मदतीने घराच्या कोणत्याही कोपऱ्यातून दार उघडता येऊ शकते. पासवर्ड असल्याने अनोळखी व्यक्ती घरात येऊ शकणार नाही. जर घराबाहेर काही संशयास्पद हालचाल आढळून आली तर या डिव्हायसेसवरुन अलर्टही मिळतो. काही स्मार्ट लॉक्समध्ये आलेल्या पाहुण्यांना तात्पुरता ॲक्सेस कोड देण्याची सोय असते.

जेणेकरुन, त्यांना तो कोड देऊन थेट घरात येता येईल. सीसीटीव्ही कॅमेरेही आता आणखी प्रगत होऊ लागले आहेत. यामध्ये ॲडव्हान्स सुरक्षेसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग, मोशन डिटेक्शन आणि नाईट व्हिजन यासारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध अाहेत. मात्र, तुम्हाला जर संपूर्ण घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे शक्य नसेल तर तुम्ही डोअरबेल कॅमेरा बसवण्याचा विचार करु शकता.

स्मार्ट मनोरंजन आता अनेक घरांमध्ये स्मार्ट टीव्हीचे आगमन झाले आहे. स्मार्ट टीव्हीबरोबरच आजकाल स्मार्ट स्पीकर्सही प्रचलित आहेत. यावरून साध्या व्हॉईस कमांडच्या साहाय्याने आपल्या आवडीचे संगीत ऐकता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()