Ideal Home : आधुनिक भारतीयांना कसे घर हवेय?

आपले घर कसे असावे, याविषयी लोकांमध्ये प्रचंड जागरूकता आणि अपेक्षा आहेत.
Ideal Home
Ideal Homesakal
Updated on

Ideal Home : आधुनिक युगात 'घर' ही संकल्पना के वळ हक्काची कायमस्वरूपी जागा, येथपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. त्याची परिभाषा बदलत चालली असून, आता हा लाईफस्टाईल जोपासणारा महत्त्वाचा घटक मानला जातो.

आपले घर कसे असावे, याविषयी लोकांमध्ये प्रचंड जागरूकता आणि अपेक्षा आहेत. आजकाल घराची खरेदी करताना विविध बाबी पाहिल्या जातात. बांधकाम व्यावसायिक व विक्रेत्यांनी या बाबी विचारात घेऊन आधुनिक घरांची निर्मिती करणे अपेक्षित आहे.

Ideal Home
Property Tax : मिळकतकर सवलतीची आज मुंबईमध्ये बैठक

लोकेशन

65% भारतीयांना घराचे लोकेशन महत्त्वाचे वाटते. परवडणारे दर 46% भारतीयांना परवडणाऱ्या दरातील घरांचे अधिक पर्याय हवे आहेत. परवडणाऱ्या किमतीत घर मिळत असेल, तर तुलनेने लहान घरांनाही प्राधान्य मिळते आहे. त्याचवेळी लाईफस्टाईलला प्राधान्य देणारे ग्राहक जिम, स्विमिंग पूल आणि क्लबहाऊस यांसारख्या सुविधा पाहून घर निवडतात.

शाश्वत मूल

ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना, उपकरणे आणि पाणीबचतीस साहाय्य करणारे तंत्रज्ञान असणाऱ्या हरित घरांना प्राधान्य मिळत आहे. बांधकामात बांबूसारख्या घटकांच्या वापराचे स्वागत केले जाते आहे.

Ideal Home
Home Made Colors : केमिकल रंगांमूळे होळीची भिती वाटतेय? मग घरीच बनवा होळीचे रंग!

आधुनिक तंत्रज्ञान

हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्ट होम डिव्हायसेस आणि स्ट्रीमिंग सेवांना ग्राहक प्राधान्य देताना दिसतात. कोविडच्या पार्श्वभूमीवर घरातून काम करण्यासाठी स्वतंत्र वर्कस्पेसला महत्त्व दिले जाते आहे.

सुरक्षा

गेटेड कम्युनिटीज्, सोसायटी मॅनेजमेंट ॲप, २४ तास सुरक्षा आणि सीसीटीव्हीला अधिक महत्त्व आहे. अशा सुरक्षा सुविधांमुळे संपूर्ण कुटुंबाची मन:शांती आणि मन:स्वास्थ्य टिकू न राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.