Gold मध्ये गुंतवणुकीपेक्षा सोन्यासारख्या घरात Investment करा

घर वा रिअल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर आज काही शहरांमध्ये वा विकसित शहरांमध्ये भाव काही अंशी वाढणं थांबलेलं असलं तरी त्यात वाढही निश्चितपणे होताना दिसणार आहे
घरात गुंतवणूक
घरात गुंतवणूकEsakal
Updated on

भरभक्कम वेतन मिळविणाऱ्या तरुणांची संख्या पुण्यासह राज्यात दिवसागणिक वाढतेच आहे. हाती पैसा खेळायला लागला की, मोठी स्वप्न बाळगलेल्या स्वप्नांसाठीचे पंख आणखी बळकट बनतात... कोणती गुंतवणूक Investment फायद्याची ठरेल..? सोनं खरेदी करावं की, सोन्यासारखं घर? Gold or Home असा प्रश्न सामान्य खरेदीदार वा गुंतवणूक दारांसमोर असलेला दिसतो आहे. मात्र अखेरीस सोन्यासारखं घरचं उत्तम म्हणावं लागेल... Which investment is better in gold or in home

ढोबळपणे खालील दोन प्रकाराने आपली गुंतवणूक होताना दिसते -

१) सहज योगाने होणारी गुंतवणूक 

२) जाणीवपूर्वक केली जाणारी गुंतवणूक 

लोक सर्व साधारणपणे सोने Gold, चांदी. मुदतठेवी, भविष्य निर्वाह निधी आदी बाबींमध्ये गुंतवणूक करतात. त्याही पुढे जाऊन काही अंशी लोक म्युच्युअल फंड Mutual Fund व शेअर बाजारामधील गुंतवणूक करतात. मात्र तुम्ही ही जाणीवपूर्वक गुंतवणूक करीत असाल वा करणार असाल तर गुंतवणुकीचे नवे पर्याय शोधायला हवेत ना ?

हे देखिल वाचा-

घरात गुंतवणूक
Home Buying विकसकांकडून सवलती आणि आटोक्यातले व्याजदर...करा विचार घर घेण्याचा

गुंतवणूक कशात करावी?

सध्या आपल्यासमोर गुंतवणुकीसाठीचे पर्यायही खूप आहेत. आज घडीला सोन्याचे भाव सतत वर- खाली होत असतात.  पण सोने, चांदी, या पारंपरिक तसेच अनिश्चितता व धोका असणारी शेअर बाजारामधील गुंतवणूक म्हणता येईल. सोने-चांदी मधील गुंतवणूक आपल्या देशात केवळ पारंपरिक गुंतवणूक नाही तर ती भावनिक गुंतवणूक आहे.  

या जोडीला पीपीएफ, मुदतठेवी आहेतच...मात्र या सर्वांमध्ये परताव्याची हमखास हमी कोणताही पर्याय देईलच असे नाही, असली तरी ती नाममात्रच. 

या उलट घर वा रिअल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर आज काही शहरांमध्ये वा विकसित शहरांमध्ये भाव काही अंशी वाढणं थांबलेलं असलं तरी त्यात वाढही निश्चितपणे होताना दिसणार आहे. त्यातही टू टायर व थ्री टायर सिटीजमधील विकास प्रक्रिया लक्षात घेता तिथेही गुंतवणूकीला चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे. ज्यामध्ये पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आदी शहरांचा समावेश करता येईल. 

विशेष म्हणजे या क्षेत्रात गुंतवणूक तुमच्याकडे पर्यायही पुरेसे आणि चांगले आहेत. ज्यात, जागा, जमीन, प्लॉट व फ्लॅटमधील गुंतवणूक यांचा समावेश होऊ शकतो. ज्याला आपण ‘रिअल इस्टेट ‘मधील गुंतवणूक म्हणतो. यात आणखीही थोडीशी अधिकची जोखीम असेलले पर्याय देखील उपलब्ध आहेत. साहजिकच अशी अधिकची जोखीम असलेल्या गुंतवणुकीत फायदाही अधिकच मिळताना दिसेल. 

जोखीम आहे अन् फायदाही...

गुंतवणूक कुठे करावी यासाठी ‘व्हीजन‘च हवे.  सद्य स्थितीत सोने आणि चांदीमधील गुंतवणूक निर्णय सर्वांना परवडेलच अशी नाही. त्यातही ती बाळगणे देखील एक ‘जोखीम‘च होऊन बसलेली आहे. सुरक्षेसंबंधाने असलेले पर्याय सर्वांनाच पुरेसे ठरतील असेही नाही. मात्र गुंतवणूक कोणती तर ती ‘रिअल इस्टेट ‘मधील जागा, जमीन, प्लॉट व फ्लॅटमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. यासंबंधाने जागा, जमीन, प्लॉटमधील गुंतवणुकीसाठी कधी-कधी जोखीम घ्यावी लागते. मात्र त्यात उत्तम परतावा मिळण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. 

या सर्व गुंतवणुकीमधील परताव्याचा विचार करता रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू देऊ शकतो. त्यात जोखीमही तशीच आहे. प्लॉटपाठोपाठ, फ्लॅट व कमर्शिअल जागेतील गुंतवणूक देखील चांगला परतावा देऊ शकते. त्यापाठोपाठ सातत्याने पण तुलनेने कमी परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे फ्लॅट भाड्याने देण्याचा पर्याय. मात्र ही गुंतवणूक कुठे करायची आणि किती करायची ही गोष्ट मात्र गरजेप्रमाणे आणि व्यक्तिगत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()