घरामध्ये रंगकाम करायचंय;  एकदा Wallpaper चा हा पर्याय पाहाच- घर दिसेल अतिशय सुंदर

वॉलपेपर लावण्याचे काम एका दिवसात पूर्ण होते. त्याचप्रमाणे रंगाच्या किमतीपेक्षा वॉलपेपरचा खर्च अतिशय कमी होतो... म्हणूनच अनेक जणांना वॉलपेपरचा पर्याय अधिक सोईस्कर वाटतो
वाॅलपेपरचा पर्याय
वाॅलपेपरचा पर्यायEsakal
Updated on

हल्ली घरातील दिवाणखान्याची एक भिंत वेगळ्याच रंगाने रंगवायची पद्धत रूढ झाली आहे. त्याचप्रमाणे एकाच भिंतीला Wall वॉलपेपर लावण्याचीही सुरुवात झाली आहे. परंतु रंग Paint लावायचा की वॉलपेपर लावायचा, हा प्रश्न अनेक जणांना पडतो. Home Decoration Tips Wallpaper For your home instead of Paint

सध्या मात्र या परिस्थितीत बदल झाला आहे. पापुद्रे निघणारे वॉलपेपर्स Wallpapers मागे पडत चालले आहेत. कोणत्याही वातावरणाचा Environment परिणाम न होणारे, वातावरणाशी समरस होणारे वॉलपेपर्स बाजारात आले आहेत. वॉलपेपर भिंतीला लावण्याचे काम अगदी सहज होते. रंगकामासाठी Painting लागणारा वेळ, घरात होणारी धूळ या सगळ्या गोष्टी वॉलपेपर लावताना टाळता येतात.

वॉलपेपर लावण्याचे काम एका दिवसात पूर्ण होते. त्याचप्रमाणे रंगाच्या किमतीपेक्षा वॉलपेपरचा खर्च अतिशय कमी होतो... म्हणूनच अनेक जणांना वॉलपेपरचा पर्याय अधिक सोईस्कर वाटतो. ज्या व्यक्ती भाड्याच्या घरात राहतात त्यांच्यासाठी, म्हणजेच अल्पकाळासाठी जर घराची आवश्यकता असेल; परंतु घराला रंग लावणे तितकेच गरजेचे असेल, तर अशा वेळी वॉलपेपर हा उत्तम पर्याय ठरतो.

हॉटेल्स, रुग्णालये या ठिकाणी आकर्षक नक्षीकाम केलेले वॉलपेपर्स उपयोगात आणले जातात.वॉलपेपरचे मुख्य काम घराचे सौंदर्य वाढविणे हे आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या भिंतींना लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपेपर्स बाजारात मिळतात.चौकटी रेषा असलेले, पावसाच्या थेंबासारखे, फळा- फुलांची चित्रं असलेले, लहान मुलांच्या झोपण्याच्या खोलीसाठी कार्टुनची चित्रं रंगवलेले, हॉटेलसाठी वेगवेगळ्या पदार्थांची चित्रं रंगवलेले; तसेच फिकट पार्श्वभूमीवर गडद फुलांचा गुच्छ रंगवलेले अशा अनेक प्रकारात वॉलपेपर्स मिळतात.

हे देखिल वाचा-

वाॅलपेपरचा पर्याय
Home Decor : घरातल्या जून्या जीन्स पासून बनवा या ५ आकर्षक वस्तू

त्याचप्रमाणे वॉलपेपरमध्ये एका भिंतीसाठी पूर्ण शीट तयार करून मिळते. दोन-तीन शीटस् एकत्र जोडून उत्तम वॉलपेपर चिकटवता येतो. हॉटेलमध्ये, रुग्णालयात असे शीटस् दिसून येतात.वॉलपेपर्समध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सही मिळतात. तुम्ही एखाद्या खोलीला खालच्या भागात एखाद्या टेक्स्चरचा रंग लावला, तर त्याला मॅच होईल अशी वॉलपेपरची बॉर्डर लावून एक वेगळाच इफेक्ट देता येतो.

काही ठिकाणी मात्र वॉलपेपरचा उपयोग होऊ शकत नाही. स्वयंपाकघर, बाथरूम या ठिकाणी रंगाचाच उपयोग आपल्याला करावा लागतो. कारण या दोन्ही ठिकाणी आग आणि पाणी यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. वॉलपेपर ओला झाल्यास तो निघण्याचा संभव असतो. आगीने तो जळला तर मोठी आपत्तीही निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे चाकू, सुरीसारख्या धारदार वस्तूंचा स्पर्श झाल्यास वॉलपेपर फाटण्याचा धोका असतो. वॉलपेपर खराब झाल्यास तो सहजपणे धुता येईल आणि त्याच्यावर दमटपणाही टिकणार नाही, असेही वॉलपेपर्स आता बाजारात उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.