आळस आपली पाठ सोडत नाही. मग ज्या गोष्टी आपल्याला अनावश्यक वाटतात; पण घरातील लोकांना आवश्यक वाटतात त्या बाल्कनीत ठेवल्या जातात. जुनी खोकी, मोडक्या छत्र्या, जुने रंग उडालेले पाट, रद्दी, जुनी भांडी यांचा ढिगारा बाल्कनीत रांगू, खेळू लागतो. Home Tips Keep your Balcony neat and Clean
प्रशस्त फ्लॅट, सुंदर लोकेशन आणि हवेशीर बाल्कनी Balcony असे शब्द ऐकले, की स्वप्नांच्या मनोराज्यात हरवून जायला होते. फ्लॅट Flat विकत घेताना होणारी सर्कस आता निवांत बाल्कनीत खुर्ची टाकून विसरता येईल, असा विचार असतो. सकाळी उठल्यावर गरम चहाचे Tea घुटके, तेही बाल्कनीत टाकलेल्या खुर्चीत बसून, सोबत आवडीचा 'सकाळ' पेपर म्हणजे दुधात साखर. 'क्या बात है!' पण हे असेच घडते का? का आपणच घडल्याचे बिघडण्यात रूपांतर करतो, याचा विचार केला, तर आपणच आपल्या बाल्कनीचे मारेकरी ठरतो.
बाल्कनी या विषयाचा आराखडा हळूहळू बदलत जातो. आळस Lezynessआपली पाठ सोडत नाही. मग ज्या गोष्टी आपल्याला अनावश्यक वाटतात; पण घरातील Home लोकांना आवश्यक वाटतात त्या बाल्कनीत ठेवल्या जातात. जुनी खोकी, मोडक्या छत्र्या, जुने रंग उडालेले पाट, रद्दी, टाकून न देण्याची भावना निर्माण करणारी
भांडी, पेप्सी कोलाच्या रिकाम्या बाटल्या यांचा ढिगारा बाल्कनीत रांगू, खेळू लागतो. 'धरलं तर चावतं सोडलं तर पळतं,' या हिशेबाने या वस्तूंची विल्हेवाट कोणी, कशी, केव्हा करायची हा प्रश्न पडतो. सतत कामाच्या ओझ्याने मिळणारा रविवार हा फुलासारखा जपला जातो. अशा अडगळीने व्यापलेल्या बाल्कनीतील फुलांच्या कुंड्या बहरलेल्या असतात.
हे देखिल वाचा-
त्याचे सौंदर्य पाहण्याची हिंमत अडगळीमुळे होत नाही. गॅस सिलिंडर संपला, की तो बाल्कनीत जाऊन प्रतीक्षा करत उभा असतो. प्रशस्त किंवा आटोपशीर बाल्कनीची काय अवस्था झाली याकडे आपले जाणूनबुजून दुर्लक्ष होते.
बाल्कनीचा हेतू स्वच्छ असतो सुंदर हवा खाण्यासाठी, खासगी खलबते करण्याचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी, आजूबाजूचे सौंदर्यनिरीक्षण करण्याचा मनोरा किंवा शेजारणीशी घरातील मंडळी कामावरून परत येईपर्यंत गप्पा मारण्यासाठी जागा. सुंदर फुलांच्या कुंड्यांनी सजवलेली, सूर्यप्रकाश देणारी, उन्हाळ्यात गारवा देणारी, तर थंडीत बोचकारे काढणारी बाल्कनी सोबत छोटासा झुलता झोका, खुर्च्या टाकून थालीपीठ-लोणी खाता येणारी किंवा आरामात बसून चहाचे घुटके घेत आनंद देणारी बाल्कनी करणे सहज शक्य आहे.
तुळशीच्या झाडाच्या साक्षीने सूर्यनारायणाचे दर्शन घेत दिवसाची सुरवात किती आनंददायी होईल. पौर्णिमेचा चंद्र, व्याधाची चांदणी आपल्या बाल्कनीतून पाहताना 'क्या बात है!' असे सहज उद्गार बाहेर पडतात. स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जाणारे हे नयनरम्य व स्वकष्टार्जित पर्यटन स्थळ आपणच दुर्लक्षून चालणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.