भारतात वास्तू शास्त्राला विशेष महत्व आहे. वास्तू उर्जेचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. जर तुमच्या अवतीभोवती ही ऊर्जा योग्यप्रकारे उपलब्ध असेल तर त्याचा तुमच्या जीवनावर Life सकारात्मक परिणाम होत असतो. How to find Vastu Dosh in House
ही ऊर्जा Energy इतकी सूक्ष्म असते ही दिसत नसली तरी अनेकदा तिचा अनुभव येत असतो. मात्र ही ऊर्जा योग्य प्रकारची नसली तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. काही गोष्टींचं निरिक्षण केल्यास तुम्हाला या उर्जेचा अनुभव येऊ शकतो. यावरून तुम्ही तुमच्या राहत असलेल्या घरात Home किंवा ऑफिसमध्ये वास्तू दोष आहे का याचा अंदाज बांधू शकता. काही लक्षणं वेळेतच नजरेत आल्यास त्यावर वेळीच उपाय करणं देखील शक्य होवू शकतं.
घरात प्रसन्न न वाटणं- बऱ्याचदा रोजची दिनचर्या योग्य प्रकारे चाललेली असते. तुम्ही पुरेशी झोप घेता, आराम करता मात्र तरिही तुम्हाला एनर्जी नसल्या सारखं सतत वाटत राहतं. सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो. कोणत्याही कामात मन रमत नाही. चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. यामागे वास्तू दोष हे एक कारण असू शकतं. यासाठी तुम्ही वास्तू तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
कंफर्ट झोनमधून बाहेर पडणं कठीण- अनेकदा आपण आपल्या रोजच्या आरामदायी आयुष्यात किंवा दिनचर्येत रमलेलो असतो कि या कन्फर्ट झोनमधून बाहेर पडणं कठीण होतं. एखाद्या ठिकाणी नोकरी करत असताना त्यात बढती किंवा पगार वाढ झाली नाही. तसचं व्यवसायातही सतत नुकसान होत राहिलं तरी तो आपण सोडण्याचं धाडस करत नाही.
त्याचप्रमाणे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किंवा नात्यांमध्ये कटूता आली तरी त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. यामुळे जीवनात काही नवं करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होत नाही. आपण कठोर निर्णय घेऊ शकत नाही. अशावेळी नक्कीच घरात किंवा ऑफिसमध्ये एखादा वास्तू दोष असण्याची शक्यता असते. या वास्तू दोषाचं वेळेत निवारण न झाल्यास नुकसान होवू शकतं.
हे देखिल वाचा-
प्रगती थांबणं- अनेकजण मोठ्या मेहनतीने , कुशलतेने आणि प्रामाणिकपणे वेळेत काम पूर्ण करत असतात. मात्र तरिही ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होत नाही तसचं प्रमोशन होत नाही.
व्यापारातही सर्व काही योग्य होत असून नफा होत नाही. नोकरी आणि व्यवसायात अनेकदा चांगल्या संधी हातातून जातात. यामुळे असे लोक कायम मागे पडतात. यामागे अनेकदा वास्तू दोषाचं कारण असतं.
आर्थिक अस्थैर्य- चांगली नोकरी आहे. चांगली कमाई आहे. कुटुंबाच्या गरजादेखील भागतात. मात्र पैसा उरत नाही. अनेकांच्या बाबतीत हे घडत असेल. रोजचा दिवस साधारण चांगला जातो. मात्र कोणतं मोठं काम होत नाही. भविष्यासाठी गुंतवणूक करणं शक्य होत नाही.
प्रत्येक महिन्यात असं काही घडतं की सर्व आर्थिक योजनांवर पाणी फिरतं. महिन्याचे पैसे महिन्याला संपून जातात. अशा वेळाला घरातील वास्तूची तपासणी करावी.
चुकीच्या लोकांशी व्यवहार- काही लोक असे असतात ज्यांच्या नशीबी कायमच चुकीचे लोक येतात. नोकरी व्यवसायात त्यांची या अयोग्य लोकांशी नेमकी गाठ पडते आणि तोटा होतो. सगळे लोक केवळ फायदा घेणारे मिळतात. अनेकदा मित्र फसवतात तर काही वेळा नातेवाईकही स्वार्थी निघतात.
मित्र मंडळी किंवा नातेसंबंधांमुळे नुकसान सोसावं लागतं. अनेकदा हे वास्तू दोषाचं कारणं असू शकतं. वास्तू दोषामुळे तुम्ही नकारात्मकता असलेल्या लोकांकडे ओढले जाता.
व्यवसायात अडथळे- वास्तू दोषामुळे अनेकदा व्यापार किंवा व्यवसायात अनेक अडथळे येत राहतात. अनेक महिने व्यवसायात यश मिळत नाही. या परिस्थितीतून कसं बाहेर पडावं हे सुचत नाही.
हे देखिल वाचा-
आनंद आणि उत्साहाचा अभाव- काहीजणांकडे सर्व काही असतं. भरपूर पैसा, घरदार,गाडी, भरपूर बँक बॅलन्स, कुटुंबाचं प्रेम मात्र असं असूनही आतून ती व्यक्ती आनंदी नसते. सगळं असूनही आयुष्य निर्थक वाटू लागत. कोणत्याही कामात आनंद वाटत नाही. जर तुमच्या सोबतही असं होत असेल तर वेळीच दखल घ्या. कारण अशी परिस्थिती एखाद्या गंभीर वास्तू दोषाचं लक्षण असू शकतं. Vastu Dosh in House
नात्यांमध्ये तणाव- कधी कधी आयुष्यात एक एक करून अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होते. नात्यांचा गुंता सुटता सुटत नाही आणि तणाव वाढचं जातो. जवळच्या व्यक्ती आपल्यापासून दुरावल्या जातात. तुम्हाला कुणीही समजून घेत नाही. तुमच्या प्रत्येक कृतीचा चुकीचा अर्थ काढला जातो. अशा वेळी वास्तू दोष असू शकतो.
या लक्षणांपैकी जर तुम्हाला ही काही लक्षण आढळून येत असतील तर तुम्ही वास्तू तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. वास्तू तज्ञांच्या सल्लाने योग्य ते उपाय करून हे दोष दूर करणं शक्य असतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.