Home Decor : घरातल्या जून्या जीन्स पासून बनवा या ५ आकर्षक वस्तू

आपण आपल्या जीन्समध्ये खूप जास्त अटॅच असतो पण अशा टाकाऊ जीन्सच नक्की काय करावं हा प्रश्न असेल ना?
DIY Home Decor Idea from Jeans
DIY Home Decor Idea from Jeansesakal
Updated on

DIY Home Decor Idea from Jeans: जीन्स ही प्रत्येकाचा जीव की प्राण असते कारण एका जीन्स ना जाणे कितीतरी फॅशन स्टाइल करता येतात, पण काही काळाने जीन्स कुजते, फाटते, खराब होते किंवा अनेकदा तर आपलंच वजन कमी जास्त होतं म्हणून फिट बसत नाही. 

DIY Home Decor Idea from Jeans
Zoo Jeans : चक्क खरेखुरे वाघ सिंह बनवतात ही जीन्स , किंमत बघून चक्कर येईल

अशातही ती जीन्स फेकण्याची इच्छा अजिबात नसते... एकतर महागाची जीन्स शिवाय जीन्स घेण्याआधी आपण खूप विचार करतो त्यामुळे अनेकदा त्या जीन्समध्ये खूप जास्त अटॅच असतो पण अशा टाकाऊ जीन्सच नक्की काय करावं हा प्रश्न असेल ना? बरं खराब असेल तर कोणालातरी वापरायला देणंही आपल्याला बरोबर वाटत नाही. 

DIY Home Decor Idea from Jeans
Jeans : रोज वापरत असलेली पहिली जीन्स कोणासाठी बनवली होती माहितीये?

या जुन्या जीन्सने तुम्ही आपल्या रोजच्या वापरासाठी आणि घरासाठी या काही खास गोष्टी बनवू शकतात.. शिवाय या गोष्टी बनवायला तुम्हाला एकही रुपया खर्च येणार नाही.. बघूया नक्की कोणत्या गोष्टी आहेत ते.. 

DIY Home Decor Idea from Jeans
Organza Saree Fashion : नवीन साडी विकत घेण्याचा प्लॅन आहे? ऑर्गेन्झा साडी आहे सगळ्यात बेस्ट!

१. स्लिंग बॅग (Sling Bag)

स्लिंग बॅग ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला लागतच असते, कुठे बाहेर फिरायला गेलो, मुव्हीला गेलो की एक छोटीशी पर्स हाताशी असणं कधीही छान, अशा छोट्या पर्स बाजारात २५०-३०० च्या खाली मिळत नाहीत अन् मिळाल्या तरी त्या प्रत्येकावेळी आपल्याला आवडतीलच असं तर अजिबातच नाही. त्यापेक्षा आपली जुनी जीन्स वापरुन तुम्ही अशी स्लिंग बॅग तयार करू शकतात. 

DIY Home Decor Idea from Jeans
Office Fashion : ऑफिस वेअरसाठी कानातल्यांची जागा घेतायत या ऑक्सिडाईज बुगड्या

२. एप्रन (Apron)

एप्रन ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला रोजच्या वापरात लागतच असते, स्वयंपाक करतांना, काही मातीकाम किंवा कलरिंग करतांना, भांडी घासतांना कानात हेडफोन टाकून छान काम करता येतं शिवाय अनेक गोष्टी हाताशीही ठेवता येतात, तुम्ही आपल्या जीन्स पासून असे भन्नाट एप्रन बनवू शकतात. 

३. बूक कव्हर (Book Cover)

बाजारात नवीन डायरींचे प्रकार सतत येत असतात, शिवाय आपले पुस्तकं ठेवायला सुद्धा अनेक प्रकारच्या पिशव्या येत असतात, अशीच एक पिशवी सध्या बाजारात दिसते आहे, जी डेणीमपासून बनवली आहे, पण ही पिशवी खूप महाग आहे, याबदल्यात तुम्ही घरीच असं एखादं कव्हर बनवू शकतात. 

DIY Home Decor Idea from Jeans
Home Decorating Ideas: PG मध्ये राहाता अन् रुम सजवायची आवड आहे? या बजेट फ्रेंडली डेकोरेशन टिप्स ट्राय करा

४. टी कोस्टर (Tea Coaster)

आपल्या छान अशा छोट्या डायनिंग टेबलवर किंवा टेबल पॉटवर चहाचे डाग छान नाही दिसत, त्यापेक्षा तिथे टी कोस्टर ठेवा म्हणजे असे डाग पडणार नाही, शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याचं कौतुक वाटेल.. 

DIY Home Decor Idea from Jeans
Zoo Jeans : चक्क खरेखुरे वाघ सिंह बनवतात ही जीन्स , किंमत बघून चक्कर येईल

५. बूकमार्क (Bookmark)

ज्यांना पुस्तक वाचायची आवड असते त्यांना नवीन नवीन बूकमार्क सुद्धा गोळा करण्याची आवड असते, तुम्ही आपल्या जीन्स पासून असे छान क्युट बूकमार्क बनवू शकतात. हे बूकमार्क तुम्ही लोकांना गिफ्ट सुद्धा देऊ शकतात. 

DIY Home Decor Idea from Jeans
Womens Jeans Style : फक्त २००० च्या आत असलेल्या या जिन्स तुमच्याकडे असल्याच पाहिजेत..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()