Vastu Tips for Painting: घरामध्ये ही पेंटिंग लावणं मानलं जातं शुभ, सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा राहिल आशिर्वाद

Home decoration tips: जर तुम्ही वास्तूशास्त्रानुसार Vastu Shastra घरामध्ये काही पेंटिंग आणि फोटो योग्य ठिकाणी लावलेत तर घरातील Home अनेक समस्या कमी होवून तुम्हाला लाभ होईल. तसचं घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल
Vastu Tips for Painting
Vastu Tips for PaintingEsakal
Updated on

Vastu Tips for Painting: घराची सजावट Decoration करत असताना आपण विविध वस्तूंनी आणि फोटो किंवा पेंटिंग लावून घराची सजावट करत असतो. केवळ लिव्हिंग रुममध्येच नव्हे तर प्रत्येक खोलीत किंवा पेसेजमध्येही विविध फोटो आणि पेंटिंग लावून घराती शोभा वाढवली जाते. Marathi Home Decor Tips Vastu Shastra Placing Painting in house

मात्र जर तुम्ही वास्तूशास्त्रानुसार Vastu Shastra घरामध्ये काही पेंटिंग आणि फोटो योग्य ठिकाणी लावलेत तर घरातील Home अनेक समस्या कमी होवून तुम्हाला लाभ होईल. तसचं घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल.

घरात अशा अनेक भिंती असतात, ज्यावर आपण विविध पेंटिग Home Decoration लावतो. अनेकदा त्या पेटिंग अशुभ नसली तरी त्यांची जागा किंवा दिशा चुकीची असल्यानेदेखील त्याचा घरामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. यासाठीच योग्य पेंटिग लावत असताना त्याचं स्थान देखील योग्य असणं गरजेचं आहे. तेव्हा पाहुयात घरात कोणत्या पेंटिंग किंवा फोटो लावणं शुभ ठरतं.

या फोटोमुळे उजळेल भाग्य

घरामध्ये धावणाऱ्या घोड्यांचा Horses फोटो लावणं शुभं मानलं जातं. धावणारे घोडे हे यशाचं, समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. घरात सकारात्मकता Positivity वाढवण्यासाठी धावणाऱ्या घोड्यांचं चित्र घरामध्ये तुम्ही लावू शकता. मात्र यामध्ये ७ धावणारे घोडे असावेत. तसचं ही फोटोफ्रेम दक्षिण दिशाला लावल्यास त्याचा आधिक लाभ होतो.

लक्ष्मी मातेचा फोटो

हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीमातेला धन देवता मानलं जातं. यासाठीच घरामध्ये आर्थिक संपन्नता नांदण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला लक्ष्मी माता किंवा कुबेराचा फोटो लावावा.

लक्ष्मी मातेचा फोटो लावतानामाता लक्ष्मी कमळामध्ये बसून त्यांच्या हातातून धनाचा पाऊस होतानाचं चित्र असावं. असा फोटो लावल्याने आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होते आणि लक्ष्मीमातेचा आशिर्वाद राहून धनलाभ होतो.

या फोटोमुळे वाढेल आयुष्य

घरामध्ये पाण्यात पोहणाऱ्या माशांचा फोटो किंवा पेंटिंग लावणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे कुटुंबातील व्यक्तींना दिर्घायुष्य लाभतं. तसचं घरामध्ये गायीचा तिच्या वासरासोबतचा फोटो लावल्याने देखील घरामध्ये सुख-समृद्धी नांदते.

आत्मविश्वास वाढण्यासाठी लावा हे पेंटिग

घरामध्ये सुर्योदय, पर्वंत रांगा आणि पाण्याचा फोटो लावणं देखील शुभ मानलं जातं. वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये उगवत्या सुर्याचं पेंटिंग लावल्यास जीवनामध्ये नवी उमेद निर्माण होते आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते.

तसचं घरामध्ये फुलांचे फोटो किंवा पेंटिंग लावल्यानं पती-पत्नी किंवा घरातील वाद विवाद कमी होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

Vastu Tips for Painting
Vastu Tips : सर्व श्रीमंतांच्या घरी हे रोप का दिसतं? जाणून घ्या

वाहत्या नदीचं चित्र

घरामध्ये वाहत्या नदीचं चित्र लावल्याने सकारात्मकता वाढण्यास तर मदत होतेच शिवाय यामुळे ताण-तणाव कमी होतो. या पेटिंगमुळे घरामध्ये उर्जा प्रवाहित राहते. वाहत्या नदीचं पेंटिग घर किंवा ऑफिसच्या पूर्वोत्तर दिशेला असावं.

घरातील कुटुंबियांचे फोटो कुठे लावावे

अनेकजण घराची सजावट करत असताना कुटुंबियांसोबतचे खास फोटो देखील घरात लावतात. हे फोटो लावताना योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे. घरात कुटुंबातील सदस्यांचे फोटो दक्षिण दिशेला असावे. तर लहान मुलांचे फोटो किंवा लॅन्डस्केप तसंच जंगलांचे फोटो पश्चिम दिशेला लावल्यास घरामध्ये सकारात्मकता वाढते.

नवविवाहित जोडप्याचे फोटो कायम खोलीत दक्षिण दिशेला असावेत. यामुळे जोडप्यांमध्ये प्रेम वाढतं.

अशा प्रकारे वास्तू शास्त्रानुसार तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू दिल्यास त्यांना ती नक्कीच आवडेल शिवाय त्यांचं भाग्य उजळण्यासही मदत होईल.

हे देखिल वाचा-

Vastu Tips for Painting
Vastu Tips : राम अन् कृष्ण तुळशीतला हा लहानसा फरक माहितीये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.