तुमच्या घरात आणा जिवंतपणा; असे करा घराचे Decoration

सजावटीत खऱ्या झाडा-फुलांचा वापर करणे कधीही चांगलेच. त्यातही फुलदाणीत रोज ताजी फुले ठेवण्यापेक्षा एक छोटी कुंडी ठेवणेच अधिक सोयीचे वाटेल. मात्र घरात असे रोप आणताना त्याची पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे
झाडांमधून घराची सजावट
झाडांमधून घराची सजावटEsakal
Updated on

घर सजवताना आपण निरनिराळ्या कलात्मक वस्तू आवर्जून आणतो. लिव्हिंग रूममध्ये शोकेससाठी खास जागा ठेवली जाते. तेथे या वस्तू रसिकतेने लावल्या जातात. यामध्ये खोट्या फुलांना, झाडांनाही Plants स्थान असते. कलात्मक वस्तूंनी सजावटीला वेगळेपण येतेच. Marathi Tips for Home Decor beautiful living room indoor plan

मात्र त्याबरोबरच लिव्हिंग रूममध्ये Living Room रसरशीत ताजेपणा आणण्यासाठी खऱ्या झाडांचा वापर करता येईल. घरातल्या झाडांचे Indoor Plants अनेक प्रकार असतात. कमी प्रकाश आणि पाणी Water लागणारी कोणतीही रोपे खोलीतील कुंडीत वाढू शकतात. लिव्हिंग रूमच्या एका कोपऱ्यात ठेवलेली ही झाडे सजावटीत Decoration निश्चितच जिवंतपणा आणतात.

सजावटीत खऱ्या झाडा-फुलांचा वापर करणे कधीही चांगलेच. त्यातही फुलदाणीत रोज ताजी फुले ठेवण्यापेक्षा एक छोटी कुंडी ठेवणेच अधिक सोयीचे वाटेल. मात्र घरात असे रोप आणताना त्याची पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे. लिव्हिंग रूमसाठी रोप निवडताना ते आकर्षक असावे, फार कचरा होणार नाही, अशी पाने असावीत.

रंगीबेरंगी बारीक फुले येणारी शोभेची झाडे, मनीप्लॅट छोट्या खोलीसाठी आदर्श आहेत. लिव्हिंग रूम मोठी असेल आणि सजावटीला ऐसपैस जागा असेल, तर मोठ्या पानांची झाडे निवडावीत. कुंडीतील झाड खूप वाढणारेही नसावे. त्याची वाढ आटोपशीर ठेवण्यासाठी व्यवस्थित निगा राखणे आवश्यक आहे.

ही कुंडी टेबलावर किंवा कोपऱ्यात नुसतीच ठेवण्याऐवजी स्टँडवर ठेवावी. अशा स्टँडमुळे रोपाची काळजी घेणे सोयीचे जाते. तसेच पाणी माती यामुळे खोली खराब होत नाही. स्टँडवर ठेवलेल्या कुंडीमुळे सजावटीला छान गेट अप येतो. कुंड्यांच्या स्टँडचे असंख्य प्रकार बाजारात दिसतील.

हे देखिल वाचा-

झाडांमधून घराची सजावट
Living Room सजावटीच्या या सात स्मार्ट टिप्स

प्लांट स्टैंड धातूचा, लाकडी किंवा क्वचित फायबर अथवा प्लॅस्टिकचाही असतो. अगदी ३०- ३५ रुपयांपासून काही हजार रुपयांपर्यंत यांची किंमत असते. कुंडीच्या आकारमानानुसार आणि त्यातील रोपाच्या प्रकारानुसार स्टैंड घ्यावा. कॅक्टससारखी झाडे लावताना डिझायनर स्टँडवर कुंडी ठेवावी.

कुंडीच्या आकारमानानुसार, त्यातील रोपाच्या प्रकारानुसार स्टैंड घ्यावा. सजावटीत स्टैंडचे महत्त्व असले तरीही त्यावरील झाड अधिक महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्टँडचा रंग, आकार आणि ठेवण त्यावरच्या झाडाशी जुळणारी असली पाहिजे. खूप उंच स्टँडवर बारीक पाने येणारी झाडे शोभणार नाहीत. रंगीत फुले येणारे रोप असेल तर स्टैंड एकाच रंगाचा असावा. अनेक घरांमध्ये कॅक्टससारखी झाडेही आवडीने लावतात. अशी झाडे लावताना डिझायनर स्टैंड असेल, तर शोभा वाढते.

हल्ली एकाच स्टँडवर शेल्फसारख्या तीन-चार कुंड्या ठेवण्याची सोय असते. लिव्हिंग रूमची शोभा वाढवायला एखादे हिरवेगार झाड निश्चितच उपयोगी पडते. सजावटीला जिवंतपणा येण्यासाठी आणि फ्लॅट संस्कृतीत थोडा का होईना निसर्ग घरात आणण्यासाठी ही सोय असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.