Living Room सजावटीच्या या सात स्मार्ट टिप्स

घराची लिव्हिंग रुम हा घराचा आरसा असतो. जितकी आकर्षक लिव्हिंग रुम तितकं घराचं वातावरण छान रहातं. येणाऱ्या पाहुण्यांनाही अशा लिव्हिंग रुममध्ये प्रसन्न वाटतं आणि वातावरणही मोकळं होतं. घराची लिव्हिंग रुम सजवायची कशी याच्या या काही टिप्स....
लिव्हिंग रुम सजावटीसाठी
लिव्हिंग रुम सजावटीसाठीEsakal
Updated on

घराची लिव्हिंग रुम हा घराचा आरसा असतो. जितकी आकर्षक लिव्हिंग रुम तितकं घराचं वातावरण छान रहातं. येणाऱ्या पाहुण्यांनाही Guests अशा लिव्हिंग रुममध्ये प्रसन्न वाटतं आणि वातावरणही मोकळं होतं. घराची लिव्हिंग रुम Living Room सजवायची कशी याच्या या काही टिप्स....Marathi Tips to Decorate Living Room of Your Home

१. लिव्हिंग रूम Living Room सजवताना एखादा तरी हँगिंग लँप Lamp, झुंबर किंवा वॉल फिटिंग अवश्य आणा. यामुळे खोलीला छान गेटअप येतो. साधा रंगीत कागदी दिवा किंवा लँपशेडदेखील चालू शकेल. खोलीच्या रंगाला अनुसरून रंगाचे दिवे, लँपशेड LampShade निवडावी.

२. छोट्या खोलीत ऐसपैस जागा असल्याचा आभास फर्निचरच्या रचनेतून आणता येते. पांढरा, निळा आणि हिरवा असे शीतल रंग लहान लिव्हिंग रूमसाठी चांगले आहेत.

३. लिव्हिंग रूमची सजावट अधिक रसिकतेने करायची असेल, तर रंगांची जादू वापरता येईल. एका भिंतीला इतरांपेक्षा गडद आणि विरुद्ध रंग वापरावा व त्या भिंतीचा फोकल पॉईंट म्हणून वापर करत त्यावर चित्र किंवा आरसा टांगावा. अशा सजावटीला एक खोली येते.

४. लिव्हिंग रूममध्ये लावलेले एखादे चित्र, टेबलावरची फुलदाणी किंवा एखादे चांगले वॉलहॅगिंग तुमची अभिजात आवड सांगून जाते. त्यामुळे या वस्तू निवडताना विचार करणे आवश्यक आहे.

५. लिव्हिंग रूममध्ये झाडांचा, फुलांचा वापर नैसर्गिक शोभा आणतो. खऱ्या फुलांबरोबर येणारी चिलटे नको असतील, तर खोटी फुलेही सजवता येतील. हल्ली हुबेहूब खऱ्या फुलांसारखी दिसणारी सॅटिनची फुले बाजारात मिळतात.

हे देखिल वाचा-

लिव्हिंग रुम सजावटीसाठी
तुमच्या घराच्या Decoration या तीन प्रकारे करा Lighting ; घराला येईल मॉर्डन लूक

६. घराला वेगळा लुक द्यायचा असेल, तर रंग देणे हा पर्याय आहे. प्रत्येक वेळी रंग बदलणे शक्य नसेल, तर खोलीतील फर्निचरच्या जागा बदलून, भिंतीवरील सजावट बदलूनही फ्रेश लुक देता येईल.

७. लिव्हिंग रूमचा रंग हा सजावटीचाच एक भाग असतो. त्यामुळे या खोलीला रंग देण्यापूर्वी विचार करावा. गडद रंगाचा वापर करून एखाद्या भिंतीसाठी करता येईल. तो सजावटीचा फोकल पॉइंट ठरेल. फोकल पॉइंट ठरवल्यानंतर त्या भिंतीवर रंगाला साजेसे एखादे चित्र लावला येईल प्रकाशयोजनाही करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.