Home construction tips: 'व्यक्ती तितक्या प्रकृती' असे म्हटले जाते. घरांचेही तसेच असते. प्रत्येक घर दुसऱ्या घरापेक्षा वेगळे असते. घरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीमुळे घराला Home घरपण येत असते.
माणसाच्या जीवनात Human Life त्याचे कर्तृत्व, नशीब आणि तो राहत असलेली वास्तू यांचा समान वाटा असतो, असे म्हणतात. Think Properly before designing your dream home
घरातील विविध वयोगटांतील व्यक्तींचे स्वभाव आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. घराच्या अंतर्गत रचनेतून अनेकदा त्या व्यक्त होत असतात. घराची रचना करणाऱ्या वास्तुरचनाकारावर Architect याची मोठी जबाबदारी असते.
आपल्याकडे आलेल्या ग्राहकांचा Customers स्वभाव, छंद, व्यवसाय, बदलती जीवनशैली, आवडनिवड या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून त्याला ग्राहकाच्या घराची रचना करावी लागते.
अशा वेळी त्याला ग्राहकाच्या गरजांना प्राधान्य देऊन आपल्या वास्तुरचनेतील कौशल्यांची त्यामध्ये भर टाकावी लागते.घराची रचना आणि संगीत आपल्या घराची रचना ठरवताना ग्राहकाने एखादी गोष्ट दुसऱ्याने केली म्हणून मला करायची आहे, असा आग्रह धरू नये.
त्यापेक्षा आपल्या स्वत: च्या गरजांना विचारांना प्राधान्य द्यावे. वास्तुरचनाकाराने आपल्याकडे आलेल्या ग्राहकांना चांगले आणि वाईट, काय करावे आणि काय करू नये, खर्च किती आणि कसा करावा या गोष्टींचा योग्य तो सल्ला द्यावा. ग्राहकाने माझ्याजवळ पैसे आहेत म्हणून मी मनमानी खर्च करणार, असा अविचार मनात आणू नये.
ग्राहकाची आवड आणि वास्तुरचनाकाराची शैली यामधूनच उत्कृष्ट वास्तुरचनेची निर्मिती घडत असते. प्रत्येक वास्तुरचनाकाराची आपापली विशिष्ट शैली असते, अथवा असायला हवी.
ग्राहकाने आपल्या आवडत्या वास्तुरचनाकाराची निवड करून त्याला घराची रचना करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. एखादा चित्रकार स्वतः च्या मनातील कल्पना कागदावर प्रत्यक्षात चित्रस्वरूपात आणतो.वास्तुरचनाकाराला ग्राहकाच्या गरजा समजून घेऊन स्वतःच्या कल्पनेतून रचना करण्याचे आव्हान असते.
ग्राहक आणि वास्तुरचनाकार यांना सुरवातीपासून शेवटपर्यंत एकमेकांच्या मतांशी जुळवून घ्यावे लागते. हे एखाद्या ऑर्केस्ट्राप्रमाणे असते. ऑर्केस्ट्रामध्ये संगीतातील अचूक परिणाम साधण्यासाठी सूर, ताल, शब्द, आवाज आणि वातावरण यांचा सुंदर मिलाप घडावा लागतो.
तसे न झाल्यास नुसता वाद्यांचा गोंगाट जाणवतो. संगीतामध्ये विविध राग असतात. प्रत्येक रागामध्ये आपले स्वतंत्र वातावरण निर्माण करण्याची ताकद असते. जसा राग बदलतो तसा त्याचा बदललेला मूड आपणास जाणवतो.
प्रत्येक व्यक्तीची संगीतातील आवड वेगवेगळी असते. कोणाला भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रुची असते, तर कोणाला पाश्चात्त्य संगीत आवडते. घराची रचनापण अशाच प्रकारे बदलत असते. म्हणूनच प्रत्येक घर इतरपिक्षा वेगळे असते.
हे देखिल वाचा-
पूर्वकालीन घरांची रचना
पूर्वीच्या काळातील घरांची रचना निसर्गाशी जवळीक साधणारी होती. कारण त्या काळात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. बांधकाम साहित्याची अचूक निवड करून त्यांचा वापर केला जात होता. जाडजूड भिंतींमुळे घराचा अंतर्गत भाग थंड राहण्यास मदत होई. घराचा आकारही प्रशस्त होता.
मध्यभागी मोकळा चौक ठेवून जास्तीत जास्त हवा आणि सूर्यप्रकाश घराच्या अंतर्भागात आणता येत असे. घराच्या अंगणातून सूर्य, चंद्र, तारे, आकाश, पाऊस, वारा, ऊन इ. निसर्गातील गोष्टींचे दर्शन घडत असे. निसर्गाला घरातूनच न्याहाळण्याचा आगळावेगळा आनंद त्यामुळे घेता येत होता.
उंच खोल्यांमुळे घरातील उष्णतेचे प्रमाण कमी होते. खिडक्यांचे आकार ठरवताना सूर्यप्रकाश आणि त्याची तीव्रता यांचा अभ्यास केला जाई. प्रकाश आणि हवा यांचे मूलभूत नियम असतात.
प्रकाश सरळ रेषेत प्रवास रोखतो; परंतु, हवेचे तसे नसते. हवेला पाहिजे तसे आपल्याला वळवता येते. खिडक्यांची रचना करताना पश्चिमेकडे छोट्या आणि पूर्वेकडे मोठ्या आकाराच्या खिडक्या ठेवल्या जात असत.
खिडकीच्या वरील भागातील व्हेंटीलेटर्समधून गरम हवा बाहेर जात असे. गरम हवा बाहेर जाण्यासाठी चिमणीचा वापर केला जात नव्हता. उजेडासाठी छताला झरोके ठेवले जात.
अशा सर्व गोष्टींमुळे घराचे अंतर्गत वातावरण आल्हाददायक आणि उत्साहवर्धक राहून त्यांचा चांगला परिणाम घरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर हाते असे.
हे देखिल वाचा-
निसर्गाशी बांधिलकी
बदलत्या काळानुसार घरांची रचना करताना सूर्यप्रकाश, हवेची दिशा, चुंबकीय क्षेत्र, उपलब्ध बांधकाम साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान, वास्तुशास्त्रातील योग्य नियम, पर्यावरणाशी बांधिलकी एकत्रित सांगड घालणे आवश्यक बनले याची आहे.
घरांची रचना ठरविताना अंतर्गत विविध खोल्यांचे आकार महत्त्वाचे असतात. ग्राहकांच्या गरजेनुसार ते बदलतात. घर म्हणजे काँक्रीटचा ठोकळा नव्हे. घराची रचना करताना निसर्गाशी जास्तीत जास्त जवळीक कशी साधता येईल, हे उद्दिष्ट ठेवावे लागणार आहे.
घर एक स्वतंत्र जीवनपद्धती आहे. निसर्ग कधीही लहान मोठा असा फरक करत नाही.निसर्गात उमललेले गणेशवेलाचे छोटे फूल आणि मोठे सूर्यफूल यांमध्ये तितकेच सौंदर्य दडलेले असते.
निसर्ग लहानमोठ्या अशा सर्वच गोष्टीतून सदैव आपणास प्रेरणा देत असतो आणि ती आपण घेतली पाहिजे. निसर्ग स्वतः च्या नियमांच्या विरुद्ध जात नसतो. माणूस मात्र निसर्गाचे नियम पायदळी तुडवतो आणि नंतर उद्भवलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी पुन्हा त्याचीच प्रार्थना करतो.
घरांचे पण तसेच असते. घरांची रचना करताना नुसता दिखाऊपणा आला, तर कालांतराने पश्चात्तापाची वेळ आल्याशिवाय राहत नाही. घराची रचना करताना वास्तुरचनाकाराला हवा, उजेड आणि अवकाश यांचे योग्य मिश्रण करावे लागते.
अनेकदा त्याचे आकलन ग्राहकांना चटकन होत नाही; परंतु, वास्तुरचनाकाराला त्याची जाणीव असते. त्याच्या मनातून तो योग्य आकलन करत असतो. ग्राहक आणि वास्तुरचनाकार घराची रचना करण्याच्या वेळी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा दोघांनी काही गोष्टी ठरविणे योग्य होईल.
अंतर्गत रचना करताना वास्तुरचनाकाराने ग्राहकाची गरज ८० टक्के आणि सजावटीवर २० टक्के भर द्यावा. घराच्या बाह्य भागातील रचना करताना मात्र वास्तुरचनाकाराच्या कल्पनेला ८० टक्के आणि ग्राहकाच्या गरजेला २० टक्के प्राधान्य द्यावे.
उगीचच इतरांचे सल्ले घेण्यापेक्षा योग्य वास्तुरचनाकाराची निवड करून आपल्याला जे आवडते त्याचा घराच्या रचनेमध्ये समावेश केला, तर आपले स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकार नक्कीच होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.