Vastu Tips : Bathroom मधला आरसा फुटला तर त्वरीत काढा..अन्यथा....

वास्तू शास्त्रानुसार Vastu Shastra घरात काही अशा जागा असतात जिथं नकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते. यापैकीच एक म्हणजे घरातील टॉयलेट आणि बाथरुम Bathroom
बाथरूमबाबत वास्तुशास्त्र टिप्स
बाथरूमबाबत वास्तुशास्त्र टिप्सEsakal
Updated on

भारतीय वास्तू शास्त्रामध्ये योग्य आणि चांगल्या आयुष्यासाठी Life अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. जर वास्तू शास्त्राप्रमाणे घरामध्ये योग्य ते बदल केले किंवा वास्तू शास्त्रानुसार घराची रचना आणि सजावट Decoration केली तर घरात आणि कुटुंबात Family कायमच सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. मात्र जर न कळत काही वास्तू नियमांचं उल्लघन झालं तर काही समस्या निर्माण होवू शकतात. Vastu Tips in Marathi Dos and Donts about Bathroom Placement

वास्तू शास्त्रानुसार Vastu Shastra घरात काही अशा जागा असतात जिथं नकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते. यापैकीच एक म्हणजे घरातील टॉयलेट आणि बाथरुम Bathroom. असं म्हणतात इथे सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा Negative Energy निर्माण होते. वास्तूनुसार बाथरुममध्ये काही गोष्टी ठेवल्यास काही दोष उत्पन्न होवू शकतात. याने नकारात्मक ऊर्जा वाढून घरातील शांती नष्ट होते तसचं आर्थिक संकटदेखील येतात. 

कोणत्या वस्तू बाथरुममध्ये ठेवू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अनेक जण आंघोळीनंतर बाथरुममध्ये ओले कपडे तसेच ठेवतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार ओले कपडे बाथरुममध्ये ठेवल्याने दोष निर्माण होवू शकतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ लागते. यामुळे कुटुंबातही नकारात्मकता वाढू लागते आणि अडचणी निर्माण होतात. 

काही बाथरुममध्ये सदैव केसांची पुंजके पाहायला मिळतात. यामुळे बाथरुम तर घाण दिसतंच शिवाय यामुळे पाण्याचा पाइप तुंबण्याची शक्यता असते. वास्तूनुसार हे देखील दोष निर्माण करू शकतं. 

बाथरुममध्ये केस आणि घाण तशीच ठेवल्यास घरात वास्तूदोष आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे कामांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि प्रगती होत नाही.

हे देखिल वाचा-

बाथरूमबाबत वास्तुशास्त्र टिप्स
Vastu Shastra for Money: पैशांची तंगी दूर करायचीय? मग या ठिकाणी आणि यावेळी लावा दिवा

अनेक लोक जण झालेली किंवा तुटलेली एखादी चप्पल टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी ठेवतात. मात्र यामुळे वास्तू दोष लागू शकतो. वास्तू आणि ज्योतिष विद्येनुसार यामुळे घरातील स्वामी आणि स्वामिनीच्या कुंडलीमधील शनि ग्रहाची स्थिती खराब होते. 

यामुळे घरातील व्यक्तींना काही वाईट काळातून जावं लागतं. यामुळे लक्ष्मीमातेचा कोप होतो आणि घरात आर्थिक दारिद्र्य येतं.

हिंदू धर्मात तुटलेला किंवा भेग गेलेला आरसा घरात ठेवणं योग्य मानलं जात नाही. वास्तू शास्त्रातही याला महत्व आहे. हाच नियम बाथरुमला देखील लागू होते. बाथरुममध्ये तुटलेला आरसा ठेवू नये. हे अशुभ मानलं जातं. 

घरात कधीही एखादा आरसा फुटला तर तो त्वरित बदलावा. अन्यथा आर्थिक संकटांचा सामाना करावा लागू शकतो आणि घरात पैशांची तंगी निर्माण होऊ शकते.

वास्तू शास्त्रानुसार घरात अनुपयोगी आणि तुटलेल्या वस्तू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. अर्थात बाथरुमसाठी देखील हा नियम लागू आहे. वास्तू नियमांनुसार प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू, शॅम्पूच्या किंवा बॉडी वॉशच्या रिकाम्या बाटल्या, सॅशे किंवा पाउच बाथरुममध्ये असणार नाहीत याची काळजी घ्यावी. नाहीतर घरात दारिद्र येऊ शकतं.

वास्तू शास्त्रानुसार बाथरुममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नये. बादली कायम पाण्याने भरून ठेवावी. यामुळे घरात सुबत्ता येते. तसचं काही ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे बादलीत कपडे धुतलेल्याचं पाणी साचवलं जातं. असं न करता बादली स्वच्छ पाण्याने भरुन ठेवावी. 

बाथरुममध्ये कधीही तांब्याच्या वस्तू ठेवू नये यामुळे देखील वास्तू दोष निर्माण होवू शकतो. त्यामुळे बाथरुम मधील तांब्याच्या वस्तू काढून टाकाव्यात. 

तसचं जर बाथरुम मधील नळ गळत असतील किंवा तुटलेले असतील तर ते त्वरित बदलावे. नळाची गळती हे दुर्भाग्याचं लक्षण असतं. यामुळे घरात आर्थिक तंगी आणि आजारपण येण्याची शक्यता वाढते. 

अनेकजण वास्तूचा विचार करताना बाथरुम आणि टॉयलेटकडे दूर्लक्ष करतात. मात्र या घरातील महत्वाच्या जागा असून इथे देखील तुम्ही वास्तूच्या नियमांनुसार योग्य ते बदल केले तर तुमच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.

टीप- हा लेख वास्तुशास्त्रातील सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहे. हा लेख प्रसिद्ध करण्यामागे अंधश्रद्धांसारख्या समजुतींचा प्रचार करण्याचा उद्देश नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.