Valentine Week Home Decor: व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो आहे, आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रोपोज करण्याचा याहून जास्त चांगला चान्स असूच शकत नाही, पण या काळात बाहेर सगळीकडे खूप गर्दी असते, अशात बाहेर जाऊन काहीतरी प्लॅन करणं जरा गडबडीचं असेल, शिवाय आपल्या पद्धतीने बाहेर काही प्लॅनिंग होणार नाही त्यापेक्षा घरीच तुम्ही तुमच्या पार्टनरला आवडेल तसं घर सजवून छान सरप्राइज देऊ शकतात...
व्हॅलेंटाईन वीक सगळ्याच कपलच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो, यादिवशी एकमेकांना गिफ्ट देऊन तुम्ही एकमेकांच्या मधलं बॉंडिंग अजून वाढवू शकतात. पण घर कसं सजवायच हा विचार करताय?.. या टिप्स वापरुन अगदी बजेट फ्रेंडली पद्धतीने तुम्ही घर सजवू शकतात.
१. कॅन्डल्स
बाजारात बऱ्याच पद्धतीच्या आकाराच्या मेणबत्या मिळतात, त्यात काही जेलीच्या सुद्धा असतात तुम्ही आपल्या साइड टेबलवर अशा सुंदर मेणबत्या लावू शकतात. तुम्ही छोट्या मेणबत्या वापरुन छान हार्टसुद्धा काढू शकतात.
२. डिनर डेट इन बाल्कनी
घरात जर एखादी बाल्कनी असेल तर त्या बाल्कनीला छान लायटिंग आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांनी सजवू शकतात. मोठा टेबल आणि इतर गोष्टींचा घाट घालण्यापेक्षा छान खाली एक गादी आंथरून सुद्धा तुम्ही डिनर एंजॉय करू शकतात.
३. क्राफ्ट पेपर लॅम्प
आपल्या बेडरूमला रेग्युलर लाइटने सजवू नका.. अशा वेळेस जरा डिम लायटिंग छान दिसेल, यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही तुम्ही DIY पद्धतीने क्राफ्ट पेपर लॅम्प बनवून रूम सजवू शकतात.
४. रोझ बुके
व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करताय आणि रोझ बुके नाही असं कसं? छान वेळ बघून आपल्या पार्टनरला असा गोड रोझ बुके देऊन तुम्ही प्रपोज करू शकतात. पण जर तुमच्या पार्टनरला गुलाब आवडत नसतील तर तुम्ही त्यांच्या आवडीचे फुलंही देऊ शकतात. डेझीची फुलं सुद्धा सध्या खूप चर्चेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.