मुख्यमंत्री सहायता निधीला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत एक कोटी ५१ लाखांचा निधी

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी; बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
pune
punesakal
Updated on

पुणे : राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आणि पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे सामाजिक बांधिलकीतून मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी ५१ लाखांचा धनादेश देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी (ता. २७) बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी हा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, सरव्यवस्थापक दिलीप दिघे आणि अनंत भुईभार या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी राज्य बॅंकेचे प्रशासक अनास्कर यांच्याशी बँकेशी निगडित मुद्यांवर सखोल चर्चा केली. तसेच, बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

pune
अनिल परबांचे निकटवर्तीय अधिकारी खरमाटे यांच्यावर ईडीचा छापा

३१ मार्च २०२१ अखेरीस आर्थिक वर्षात बॅंकेची वार्षिक उलाढाल ४३ हजार ६०२ कोटींची आहे. बँकेने ३६४ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या ठेवी २० हजार ३०८ कोटी रुपये आणि कर्जे २३ हजार २९५ कोटी रुपये इतकी आहे. बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण १.२० टक्के इतके आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.