10th Admission : दहावीनंतर पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

दहावीनंतर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता पूर्णवेळ पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
10 th Admission
10 th Admissionsakal
Updated on

10 th Admission - दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन नोंदणी करणे आणि अर्ज करण्यासाठी सात जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता सात जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

10 th Admission
Mumbai Local Train : आता मोबाईल युटीएस अँपमधील तिकीटच दाखवा, अन्यथा...

दहावीनंतर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता पूर्णवेळ पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी यापूर्वी दिलेली मुदत शुक्रवारी (ता.३०) संपली. ही मुदत संपतानाच संचालनालयाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

10 th Admission
Pune : दफनभूमीच्या मार्गात जाण्याकरिता नागरिकांना अडथळा

दरम्यान, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुदत वाढवून न देता अचानकपणे प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ दिली जात असल्याने पालकांचा गोंधळ उडत आहे. राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित,

विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेच्या अंतिम तारखेस तंत्रशिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे.

10 th Admission
Mumbai News : आली लहर केला कहर! पठ्ठ्याने ट्रक थेट समुद्रातच घुसवला

प्रवेश प्रक्रियेच्या कॅप फेरी व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू ठेवल्या जाणार आहेत. तर ७ जुलैनंतर ई-स्क्रुटनी पद्धतीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीद्वारे नोंद होणारे,

पडताळणी आणि निश्चित होणारे अर्ज संस्था स्तरावरील आणि कॅप व्यतिरिक्त जागांसाठी विचारात घेतले जाणार आहेत, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे.

10 th Admission
Pune : संस्थास्तरावरील प्रवेशांवर सीईटी सेलची करडी नजर

कॅपच्या विविध फेऱ्याकरिता विकल्प अर्ज भरणे, कॅप जागा वाटप, जागा स्वीकृती करणे, विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख, पुढील वेळापत्रक हे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येईल, असे तंत्रशिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

10 th Admission
Mumbai : मुंबईतील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली! राष्ट्रीय उद्यानाला ४ दिवसांत ६ हजार नागरिकांची भेट

पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक

- प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे : ७ जुलैपर्यंत

- प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे : ७ जुलैपर्यंत

- विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : १० जुलै

- सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रार, असल्यास त्या सादर करणे : ११  आणि १२ जुलै

विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : १४ जुलै

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://poly23.dtemaharashtra.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.