स्मार्ट पुण्याचा आयटी विभाग 'हँग’

केवळ ११ जण सांभाळतात कामाचा डोलारा
स्मार्ट पुण्याचा आयटी विभाग 'हँग’
Updated on

पुणे : महापालिकेकडून नागरिकांना सेवा आणि परवानग्या ऑनलाइन देण्याचा देऊन ‘स्मार्ट’ कारभार करण्याचा प्रयत्न सुरू असताना या ऑनलाइन यंत्रणेसाठी काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विभागात (आयटी) गरज ७० जणांची आहे पण केवळ ११ जण कार्यरत आहेत. महापालिकेचा कामाचा व्याप आणि हद्द वाढत असताना प्रशासनाचे काम व्यवस्थित चालावे यासाठी आयटी विभाग लक्ष देत असला अपुऱ्या मनुष्यबळा अभावी कामाच्या बोजा खाली हा विभागच ‘हँग’ होत आहे.

‘आयटी हब’ म्हणून पुणे शहराची देशभरात ओळख निर्माण झालेली असताना महापालिकेने देखील त्यादृष्टीने पाऊल उचलण्यास काही वर्षांपूर्वी सुरवात केली. त्यामुळे सध्याच्या स्थितीत महापालिकेची बहुतांश सर्व विभाग ऑनलाइन पद्धतीने कार्यरत आहेत. मिळकतकर विभाग, बांधकाम विभाग, समाज विकास विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण, सर्व क्षेत्रीय कार्यालये, पाणी पुरवठा, मालमत्ता व्यवस्थापन, मैलापाणी व्यवस्थापन या विभागांचे बहुतांश काम ऑनलाइन सुरू आहे. त्याचा फायदा नागरिकांना होत आहेच, पण प्रशासकीय कामकाज देखील व्यवस्थित होत आहे.

स्मार्ट पुण्याचा आयटी विभाग 'हँग’
स्वातंत्र्यदिनानिमित्त जर्मनीत सायकल रॅली

महापालिकेचे विविध विभाग, १५ क्षेत्रीय कार्यालये, कोरोना डॅशबोर्ड असे सुमारे ५५ ते ६० विभागांचा माहिती व तंत्रज्ञान विभागाला लक्ष ठेवावे लागते. महापालिकेचे कार्यालय सुरू झाल्यानंतर सर्व विभागातील सॉफ्टवेअर, नेटवर्कची तपासणी करणे, काही अडचणी असतील तर त्या त्वरित सोडाव्या लागतात. महापालिकेच्या संकेतस्थळावर विविध प्रकारची माहिती अपडेट करणे, नव्याने जाहीर होणाऱ्या योजना आकर्षक स्वरूपात मांडणे यासह अनेक कामे या विभागातील कर्मचाऱ्यांना करावी लागतात. यासह इतर तांत्रिक कामे करणे, नवीन प्रोग्रॅम विकसित करण्याचे काम करावे लागते. पण सध्या ही सगळी जबाबदारी ११ जणांवर येऊन पडलेली आहे.

स्थायी समितीत ठराव

आयटी विभागात कमी मनुष्यबळ असल्याने त्वरीत पदभरती करावी असा ठराव स्थायी समितीने जानेवारी महिन्यात केला होता. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी पदभरतीचे आदेश देखील दिलेले होते, पण त्यानंतर पुढे कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे.

७ प्रोग्रामवर, ३ ऑपरेटर

महापालिकेच्या आकृतिबंधात माहिती तंत्रज्ञान विभागासाठी विविध कामांसाठी ७० पदे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामध्ये नेटवर्किंग, सॉफ्टवेअर इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता, प्रोग्रॅमर, ऑपरेटर, हार्डवेअर, सिस्टीम अॅनालिस्ट, नेटवर्किंग इंजिनिअर यासह इतर पदांचा यात समावेश आहे. या प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे. पण सध्या महापालिकेचे केवळ ७ प्रोग्रामवर, ३ ऑपरेटर आहेत व एक विभागप्रमुख असे ११ जण कार्यरत आहेत. मिळकतकर विभागाचा व्याप मोठा असल्याने त्यांनी ८ जणांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेले आहे.

स्मार्ट पुण्याचा आयटी विभाग 'हँग’
लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने केला प्रियकराचा खून

''महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या केवळ ११ जण कार्यरत आहेत. कामाचे स्वरूप बदलत असताना आमच्या विभागाचे महत्त्व वाढत आहे, त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. सध्या कमी लोक असल्याने त्याचा ताण निर्माण होत आहे. नव्याने २३ गावे देखील समाविष्ट झाल्याने त्याचा विचार करून पदभरती होणे आवश्‍यक आहे.''

- राहुल जगताप, प्रमुख, संगणक विभाग

येणाऱ्या अडचणी

  • यंत्रणा सुरळीत सुरू आहे की नाही तपासण्यात वेळ जातो

  • एकाच वेळी अनेक विभागाची अडचण सोडविताना तारांबळ उडते

  • नागरिकांना ऑनलाइन सुविधा देताना अडचणी येणे

  • जन्म-मृत्यू दाखल्याचे सर्व्हर वारंवार बंद पडणे

  • ऑनलाइन पैसे भरताना अडथळे येणे

  • नवीन प्रकल्प राबविणे व दैनंदिन काम याचा ताळमेळ घालणे अवघड

टॉप पाच ऑनलाइन सेवा

  • मिळकतकर - सुमारे ६.७५ लाख

  • सोशल मीडियातून येणाऱ्या तक्रारी - सुमारे ९५ हजार

  • जन्म-मृत्यू दाखला - सुमारे ५० हजार

  • डीबीटी - सुमारे ५० हजार

  • बांधकाम विभाग - सुमारे ५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.