बालमजुरीचा विळखा सुटणार कधी?

कचरा वेचकांसमवेत कामाच्या ठिकाणी आढळली २१४ मुले
बालमजुरीचा विळखा सुटणार कधी?
Updated on

पुणे : ‘‘शाळा बंद असल्याने मी दररोज आईसोबत कचरा वेचायला येते. मी कचरा वेचत नाही; पण कचरा निवडण्यात तिला मदत करते’’, असे इयत्ता सातवीत असणारी मयूरी धावरे सांगत होती. तिला शिकायचे आहे; पण शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतरच ते शक्य होणार आहे. तिच्याप्रमाणे शहरातील कचरा वेचकांची जवळपास २१४ मुले आई-वडिलांसोबत कामाच्या ठिकाणी येत असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.(12 june world day against child labour 2021)

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्थेतर्फे ‘मिस कलेक्ट’ प्रकल्पातंर्गत मार्च ते मे २०२१मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यातून ‘कचरा वेचकांच्या मुलांची सद्यःस्थिती आणि मुलांची कामावर येण्याची कारणे’ जाणून घेण्यात आली. यात तीन हजार ३९९ कचरा वेचक सहभागी झाले होते. त्यापैकी २१४ मुले त्यांच्यासोबत कामाच्या ठिकाणी येत असल्याचे आढळले, असे निरीक्षण कष्टकरी पंचायतीचे कायकर्ते आदित्य व्यास यांनी नोंदविले. आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनाचे (१२ जून) औचित्य साधून हे सर्वेक्षण करण्यात आले.

कामाच्या ठिकाणी आढळलेली मुले
-परिसर : मुलांची संख्या

  • औंध-बाणेर : ३४

  • धनकवडी-सहकारनगर : ३१

  • वारजे-कर्वेनगर : २६

  • येरवडा-धानोरी : १८

  • शिवाजीनगर-घोले रस्ता : १८

  • भवानी पेठ : १८

  • कोथरूड-बावधन : १४

  • कोंढवा-येवलेवाडी : १०

  • नगर रस्ता-वडगाव शेरी : १२

  • इतर ठिकाणी : ३३
    एकूण : २१४

मुला-मुलींचे प्रमाण
मुली : ६१
मुले : १५३

शाळा सुटण्याची कारणे :
-शाळेत नाव नोंदणी नसणे
-कोरोनामुळे शाळेत जाणे अशक्य
- शाळेचे शुल्क भरू न शकणे

प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर मुलांचा शाळेत प्रवेश नक्की झाला आहे की नाही, हे कळेल. सरकारने कष्टकरी पालकांच्या मुलांना पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- राणी शिवशरण, कचरा वेचक, हडपसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.