पुणे : म्युकरमायकोसिसच्या १३ टक्के रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काळी बुरशी म्हणजे म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून आले. राज्यात सोमवारपर्यंत (ता. १०) या आजाराने निदान झालेल्या रुग्णांपैकी सात हजार ८९० रुग्ण बरे झाले.
Mucormycosis
MucormycosisSakal
Updated on

पुणे - म्युकरमायकोसिसमुळे राज्यात एक हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात १० हजार २६६ रुग्णांना म्युकरमायकोसिसचे निदान झाले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काळी बुरशी म्हणजे म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून आले. राज्यात सोमवारपर्यंत (ता. १०) या आजाराने निदान झालेल्या रुग्णांपैकी सात हजार ८९० रुग्ण बरे झाले. मात्र, हा आजार असलेल्या १३ टक्के (१ हजार ३७६) रुग्णांचा मृत्यू झाला, अशी आकडेवारी आरोग्य खात्याने दिली.

म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी वेगवेगळ्या विशेषज्ज्ञ डॉक्टरांची गरज असते. त्यात कान, नाक आणि घसा तज्ज्ञांसह, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, मेंदू शल्यचिकित्सक अशा अनुभवी डॉक्टरांचा संघ त्यासाठी आवश्यक असतो. असे तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या राज्यातील ५९२ रुग्णालयांमधून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ९७ सरकारी रुग्णालये होती, तर, ४९५ खासगी रुग्णालयांचा समावेश होता. या आजारासाठी ‘अँफोटेरेसिन-बी लायफोसोमल’ हे अत्यंत महागडे औषध आहे. त्यामुळे या उपचारांचा खर्च बहुतांश रुग्णांमध्ये २० ते ३० लाखांहून अधिक झाला. हा आजार झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांसाठी १३१ रुग्णालयांमधून महात्मा फुले जीवनदायी योजनेतून उपचार करण्यात आले. त्यात ७६ खासगी रुग्णालये होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले होते. त्याच धर्तीवर दुसऱ्या लाटेमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढले. त्यामुळे या आजारावर नेमके कसे उपचार करावेत, यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला.

Mucormycosis
Khadkwasla : शिवणे येथे एक दीड तास वाहतूक कोंडी

लशीसाठीच्या सिरींजची गुणवत्ता कमी

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुरविण्यात येणाऱ्या सिरींजची गुणवत्ता चांगली नसल्याचा अनुभव आरोग्य सेवकांना येत आहे. त्यामुळे यापूर्वी लशीच्या एका वायलमधून दहा ते अकरा डोस दिले जात होते. ती संख्या आता आठ ते नऊपर्यंत कमी झाली आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे.राज्यात कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून इंजेक्शन सिरींजची मागणी वाढली आहे. लस आणि सिरींज आतापर्यंत केंद्र सरकारकडून पुरविण्यात येत होती. मात्र, लसीकरणाचा वेग वाढल्याने सिरींजचा राष्ट्रीय पातळीवर तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे राज्यांनी सिरींज खरेदी करून त्याचे वितरण करण्याची सूचना केंद्राने दिली होती. या दरम्यान, आता पुन्हा काही प्रमाणात केंद्राने सिरींजचा पुरवठा सुरू केला आहे. पण, त्याची गुणवत्ता चांगली नसल्याची माहिती पुढे येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()