School : पुणे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांना कुलूप; झेडपीची कारवाई

पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४९ पैकी १३ अनधिकृत शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कुलूप लावले आहे.
ZP School
ZP Schoolesakal
Updated on

पुणे - पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४९ पैकी १३ अनधिकृत शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कुलूप लावले आहे. त्यामुळे कुलूप लावलेल्या या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, अन्य १० शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ अनधिकृत शाळांची यादीच १० जुलै रोजी जाहीर केली होती. या यादीतील १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या १३ शाळांमध्ये पुणे शहरातील तीन, पिंपरी चिंचवडमधील दोन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठ शाळांचा समावेश असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी मंगळवारी (ता. २३) सांगितले.

चालू शैक्षणिक वर्षात जाहीर करण्यात आलेल्या एकूण ४९ अनधिकृत शाळांपैकी पाच शाळांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित ४४ शाळांपैकी ३ शाळांना राज्य सरकारकडून इरादा पत्र मिळाले आहे. दोन शाळांनी दंड भरला असून अन्य चार शाळांनी जिल्हा परिषदेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आणखी १२ शाळांवर कारवाई करणे बाकी आहे.

बंद करण्यात आलेल्या शाळा

पुणे शहर - केअर फाउंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महंमदवाडी रोड, हडपसर, सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी, संस्कृती इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव खुर्द.

पिंपरी चिंचवड - माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी व श्री. चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल विशालनगर, पिंपळे निलख.

ग्रामीण जिल्हा - किड्जी स्कूल, शालीमार चौक, दौंड, जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशू विकास कासुर्डी, ता. दौंड, यशश्री इंग्लिश मीडियम स्कूल सोनवडी, ता. दौंड, भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई, ता. खेड, श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, ता.हवेली, रिव्हस्टोन इंग्लिश मीडियम स्कूल, पेरणे फाटा, ता. हवेली, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर,गहुंजे, ता. मावळ आणि व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, नायगाव, ता. मावळ.

गुन्हे दाखल झालेल्या शाळा

- जिझस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल खामशेत, ता. मावळ

- किंग्ज वे पब्लिक स्कूल, रायवूड, लोणावळा, ता. मावळ

- इ.एम.एच. इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी, ता. हवेली

- रामदास सिटी स्कूल. रामदरा, लोणी काळभोर, ता. हवेली

- ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, उंड्री, ता. हवेली

- लिट्ल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर

- ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, लिंक रोड, चिंचवड

- आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे गुरव

- पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट गांधीनगर, पिंपळे निलख

- तक्वा एज्युकेशन ट्रस्ट संचलित टीम्स तक्वा इस्लामिक स्कूल एंड मक्तब, कोंढवा खुर्द, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com