सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग सतर्क आहे. दरम्यान पुण्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना 138 कोटींचे सोने सापडले आहे. पुण्यातील सहकारनगर भागात नाका बंदी करत असताना पोलिसांनी हे सोने जप्त केले. पोलिसांनी या संदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला माहिती कळवली आहे.
दरम्यान इतक्या मोठ्या किमतीचे सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याचबरोबर ते कुठून आले व कुठे जात होते याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.