पुणे झेडपीच्या १४ जागा मागासवर्गींयांसाठी राखीव

पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांपैकी १४ गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित होणार आहेत.
Pune-ZP
Pune-ZPsakal
Updated on
Summary

पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांपैकी १४ गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित होणार आहेत.

पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांपैकी १४ गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित होणार आहेत. यापैकी अनुसूचित जातीसाठी (एससी) आठ आणि अनुसूचित जमातीसाठी (एसटी) सहा जागा असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आठपैकी चार जागा सर्वसाधारण व चार जागा महिलांसाठी तर, अनुसूचित जमातीच्या जागांपैकी तीन जागा सर्वसाधारण आणि तीन जागा या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केल्या जाणार आहेत. मागासवर्गीयांसाठी कोणते १४ गट राखीव होणार, याचा फैसला येत्या १३ जुलैला होणार आहे. दरम्यान, आगामी खुल्या गटांच्या जागांमध्ये यंदा १३ ने वाढ होणार आहे.

गटांची संख्या वाढल्याने आणि यंदाच्या गटांच्या आरक्षण सोडतीतून नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) वगळण्यात आल्याने खुल्या गटांच्या जागांत वाढ झाली असल्याचे बुधवारी (ता.६) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्यांची संख्या ही ७५ इतकी होती. त्यात सुधारणा केल्याने, आता आणखी सातने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता ८२ होणार आहे.

पूर्वीच्या एकूण ७५ जागांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण २०, अनुसूचित जातीसाठी (एससी) सात आणि अनुसूचित जमातीसाठी (एसटी) पाच अशा एकूण जागा राखीव होत्या. उर्वरित ४३ जागा या खुल्या गटांसाठी होत्या. मात्र यापैकी २२ जगा या खुल्या गटातील महिलांसाठी राखीव होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील ७५ पैकी २१ जागा या खुल्या गटासाठी होत्या. त्यात आता १३ ने वाढ होऊन ही संख्या ३४ वर जाणार आहे. शिवाय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या जागेत एकने तर, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या जागेत दोनने वाढ होणार आहे.

झेडपीच्या ८२ जागांचे संभाव्य आरक्षण

- अनुसूचित जाती (एससी) प्रवर्ग --- ०८ (पैकी चार महिला)

- अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्ग --- ०६ (पैकी तीन महिला)

- खुल्या गटांसाठी --- ६८ ( पैकी ३४ महिला)

- विविध प्रवर्गातील महिलांसाठी --- एकूण ४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.