Samata Bank Case : नागपूरच्या समता बँकेतील १४५ कोटींचे गैरव्यवहार प्रकरण; १७ वर्षांपासून फरारी आरोपीला CID कडून अटक

बँकेचा कर्जदार असलेल्या दायमाने तारण न देता समता बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु त्याची परतफेड न करता आर्थिक फसवणूक केली होती.
Samata Bank Case
Samata Bank CaseSakal
Updated on

Pune News : नागपूरच्या समता सहकारी बँकेतील १४५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने हैद्राबादमधून अटक केली. मागील १७ वर्षांपासून तो पुणे, मुंबई आणि तेलंगण राज्यात स्वत:ची ओळख लपवून वास्तव्य करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

विजयकुमार रामचंद्र दायमा (रा. फेअर व्ह्यू सोसायटी, गायत्रीनगर, हैदराबाद, तेलंगण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नागपूर येथील समता सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदारांनी संगनमताने बनावट कर्ज प्रकरणे करून १४५ कोटी ६० लाख रुपयांची गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली होती.

१९९७ ते २००७ या कालावधीत हा प्रकार घडला होता. याबाबत नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात ५७ जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडून करण्यात येत होता.

बँकेचा कर्जदार असलेल्या दायमाने तारण न देता समता बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु त्याची परतफेड न करता आर्थिक फसवणूक केली होती. सीआयडीच्या पथकाने आरोपी दायमाचा नातेवाइकांसह विविध ठिकाणी शोध घेतला.

परंतु तो सापडत नव्हता. अखेर १७ वर्षांनंतर तो हैदराबादमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने दायमाला हैद्राबादमधून १२ मे रोजी अटक केली. त्याला नागपूरमधील सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील - भुजबळ, पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक आनंद रावडे, पोलिस हवालदार विकास कोळी, सुनील बनसोडे, प्रदीप चव्हाण यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.