पुणे रेल्वेच्या १५ गाड्या रद्द

गुरुवारपासून २५ ते ३० जून दरम्यान या गाड्या बंद
15 trains of Pune Railway canceled between 25th to 30th June)
15 trains of Pune Railway canceled between 25th to 30th June)
Updated on

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडॉउनमुळे प्रवासी संख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे रेल्वेच्या सुमारे १५ गाड्या रद्द केल्याचे पुणे विभागाने कळविले आहे. गुरुवारपासून २५ ते ३० जून दरम्यान या गाड्या बंद असतील. (15 trains of Pune Railway canceled between 25th to 30th June)

15 trains of Pune Railway canceled between 25th to 30th June)
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी खूनाच्या घटनेनं खळबळ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस, पुणे-नागपुर, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापुर-नागपुर, दादर-पंढरपुर, दादर- साईनगर शिर्डी, मुंबई-गदग, मुंबई-कोल्हापुर, मुंबई- बिदर, मुंबई-सोलापुर, मुंबई-लातूर एक्सप्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. परतीच्या मार्गांवरील या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. या गाड्या पुन्हा केव्हा सुरू होणार, याबाबत नंतर जाहीर करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने नागपूर मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे.

15 trains of Pune Railway canceled between 25th to 30th June)
पतीला वाचवण्यासाठी लता करे मॅरेथाॅन धावल्या पण, कोरोनाने घात केला

प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रेल्वेगाड्या बंद

सोलापूर : दक्षिण-मध्य रेल्वेव्दारे सुरु करण्यात आलेल्या विशेष एक्‍सप्रेस गाड्या प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पुढील सर्व गाड्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक 06271 यशंवतपूर-बिदर विशेष एक्‍सप्रेस धावत आहे. गाडी प्रारंभ 4 मेपासून, गाडी क्रमांक 06272 बिदर- यशंवतपूर विशेष एक्‍सप्रेस धावत आहे. गाडी प्रारंभ ता. 5 मे, गाडी क्रमांक 06583 यशंवतपूर-लातूर विशेष एक्‍सप्रेस धावत आहे. गाडी प्रारंभ ता. 5 मे, गाडी क्रमांक 06584 लातूर- यशंवतपूर विशेष एक्‍सप्रेस धावत आहे. गाडी प्रारंभ ता. 6 मे. तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्‍चित करावा असे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले आहे.

15 trains of Pune Railway canceled between 25th to 30th June)
एप्रिलमध्ये पुणे रेल्वेला कोट्यावधींचा नफा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.