वीर धरणातून नीरा नदी पात्रात १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू

धरणाचे तीन दरवाजे चार फुटाणे उचलले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15,000 cusecs of water is being released from Veer Dam into Neera River basin
15,000 cusecs of water is being released from Veer Dam into Neera River basin
Updated on

परिंचे - नीरा नदीच्या खोऱ्यात पावसाची संततधार सुरू असल्याने वीर (ता. पुरंदर) धरणातून मंगळवारी (दि.९) रोजी दुपारी चार वाजता नीरा नदी पात्रात १३९११ क्यूसेक व उजव्या कालव्यातून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले असून डाव्या कालव्यातून ३००क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचे तीन वर्क दरवाजे चार फुटाणे उचलण्यात आला असून नीरा नदी पात्रात एकूण पंधरा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री केव्हाही विसर्गात वाढ करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतरतेचा इशारा देण्यात आला असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले यावेळी शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक उपस्थित होते.

नीरा नदी पाणलोट क्षेत्रात तेल धरण साखळी क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीस दिवसांच्या विश्रांती नंतर धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

भाटघर धरणात ८१ टक्के भरले असून १९ टिएमसी पाणी साठा झाला आहे.नीरा देवघर धरणात ७६ टक्के भरले असून ९ टिएमसी पाणी साठा झाला आहे गुजवणी धरणात ९४ टक्के भरले असून ३.३२ टिएमसी पाणी साठा झाला आहे. वीर धरण शंभर टक्के भरले असून ९.८३ पाणी साठा झाला आहे. धरणातून पंधरा हजार क्युसेक पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणे पुर्ण क्षमतेने भरली नसल्याने या धरणातून पाण्याची आवक होत नाही. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातून तसेच कानंदी नदी व पुरंदर मधील रुद्र गंगा व केदार गंगा नदी मधून वीर धरणात पाण्याची आवक होत असून एकूण १२ हजार क्युसेक पाणी वीर धरणात येत आहे. वीर धरण प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना म्हणून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री केव्हाही विसर्गात वाढ करण्यात येणार असून पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व नदी काठच्या तालुक्यातील तहसीलदार, पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले यावेळी अरुण भोसले, संभाजी शेडगे, कालिदास तावरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()