Pune : मिळकत कर बिलापोटी महापालिका तिजोरीत दोन दिवसात 16 कोटी रुपये जमा

महापालिकेच्या मिळकत कर विभागाने 15 मे पासून ऑनलाईन मिळकत कर बिले उपलब्ध
16 crores deposited in municipal treasury in two days property tax pune
16 crores deposited in municipal treasury in two days property tax puneesakal
Updated on

पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने 15 मे पासून ऑनलाईन मिळकत कर बिले उपलब्ध करून दिल्यानंतर दोन दिवसातच पुणेकरांनी तत्काळ प्रतिसाद देत 16 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले. महापालिकेने पहिल्या दिवशी 7 लाख 60 हजार मिळकतकरधारकांची बिल ऑनलाईन उपलब्ध करुन दिली होती.

राज्य शासनाकडे प्रलंबित 40 टक्के कर सवलतीच्या प्रश्नांची दखल घेऊन राज्य सरकारने 40 टक्के परवानगी देण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर महापालिकेने 15 मे पासून मिळकत कर बिले ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली होती. महापालिकेच्या मिळकत कर विभागाने पहिल्या दिवशी 7 लाख 60 हजार मिळकतकरधारकांची बिल ऑनलाईन उपलब्ध करुन दिली होती.

16 crores deposited in municipal treasury in two days property tax pune
Property Expert : वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

दरम्यान, पुणेकरांनी ऑनलाईन मिळकत कर तत्काळ भरण्यास प्राधान्य दिले. त्यानुसार, सोमवारी 8 कोटी 48 लाख रुपये नागरिकांनी भरले. मंगळवार पर्यंत 16 कोटी 74 लाख रुपयांपर्यंतची रक्कम नागरिकांनी मिळकत करापोटी भरले, अशी माहिती कर आकारणी व संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

16 crores deposited in municipal treasury in two days property tax pune
Pune Nashik Highway:HIghway: हायवेवर थरार ! ३५ प्रवाशी असताना धावत्या एसटीची चाकं निखळली अन्...Video

आगामी काही दिवसांत सर्व मिळकत कर बिले ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रत्यक्षात बिल 31 मे पर्यंत नागरिकांना पाठविण्यात येणार आहेत. 2019 पासून आकारणी झालेल्या मिळकत धारकांनी तसेच समाविष्ट गावांतील नागरिकांनी 15 नोव्हेंबरपर्यंत लगतच्या क्षेत्रिय कार्यालय, कर निरीक्षकांकडे पीटी फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.