बारामती : कोविडची बारामतीत तिसरी लाट(third wave of corona ) आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासात बारामतीत तब्बल 170 जण कोविड पॉझिटीव्ह सापडले आहेत. या पैकी 9 जण बारामती तालुक्याबाहेरील असून उर्वरित 161 जण बारामती शहर व तालुक्यातील आहेत. गेल्या 24 तासात आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेन अशा 1165 तपासण्या करण्यात आल्या, त्या पैकी 170 जण पॉझिटीव्ह(corona positive) आढळले आहेत. ही टक्केवारी जवळपास 15 टक्क्यांवर गेली असून गेल्या आठ दिवसात सातत्याने कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. (170 patients corona positive in one day at baramati)
बहुसंख्य रुग्णांमध्ये किरकोळ स्वरुपाची लक्षणे आहेत आणि अनेकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असल्याने काळजीचे फारसे कारण नसले तरी इतक्या मोठ्या संख्येने पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ही तिसरी लाटच आली असल्याचे सगळ्यांचेच म्हणणे आहे. कमालीची थंडी, दिवसभर हवेत असलेला गारठा आणि ढगाळ वातावरण त्यात बोचरे वारे या मुळे आजारी पडणा-यांची संख्याही मोठी आहे. कुटुंबात अनेक जण वेगाने पॉझिटीव्ह आढळत असल्याने संख्याही वाढू लागली आहे.
बारामतीत आरोग्य यंत्रणा सतर्क (Health system alert)असून ऑक्सिजन बेड(oxgyen bed), आयसीयु युनिट व व्हेंटीलेटरची(ventilator) सुविधा उपलब्ध आहे, मात्र सुदैवाने गृहविलगीकरणच(home Quarantine ) अधिक आहे. प्रशासनाने तपासण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला असून ज्यांना शंका येत असेल त्यांनी तातडीने तपासणी करुन पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेगाने पसरणारा विषाणू असल्याने झपाट्याने वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा, काहीही त्रास होत असल्यास दुखणे अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.