रक्षाबंधनामुळे सकाळपासून पीएमपीच्या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पीएमपी प्रशासनाने गुरुवारी १८१२ बस रस्त्यांवर उतरविल्या.
पुणे - रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत पीएमपीने गुरुवारी १८१२ बस सोडल्या होत्या. यातून एका दिवसात सुमारे १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला तर यातून पीएमपीला सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. नेहमीच्या तुलनेत सुमारे तीन लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला तर यातून सुमारे चाळीस लाख जास्तीचे उत्पन्न मिळाले आहे.
रक्षाबंधनामुळे सकाळपासून पीएमपीच्या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पीएमपी प्रशासनाने गुरुवारी १८१२ बस रस्त्यांवर उतरविल्या. सकाळच्या सत्रात सुमारे ९० लाख रुपयांचे तर दुपारच्या सत्रांत ८५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा दरम्यान ही प्रवासी वाहतूक झाली.
पीएमपी सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. यातून १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला तर उत्पन्न देखील पावणे दोन कोटी रुपये इतके झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये अधिकारी वर्ग देखील विविध ठिकाणी फिरून वाहतुकीवर लक्ष ठेऊन होता.
- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे
३५० अतिरिक्त एसटी धावल्या
रक्षाबंधनानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या वतीने गुरुवारी ३५० अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या. यातून सुमारे तीस हजार प्रवाशांनी प्रवास केला. एसटीच्या या अतिरिक्त गाड्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून गुरुवारी स्वारगेटसह शिवाजीनगर बस स्थानकावरून अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यात स्वारगेटहून २०० तर शिवाजीनगरहून १५० एसटी गाड्या सोडण्यात आल्या. स्वारगेट बस स्थानकांवरून १,३१२ टायमिंगच्या गाड्या सोडण्यात आल्या. यातून सुमारे ७० हजार प्रवाशांची वाहतूक झाली. स्वारगेटहून सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, सातारा, बारामती, सांगली व मिरज आदी ठिकाणी या गाड्या सोडण्यात आल्या. तर शिवाजीनगर स्थानकावरून नाशिक, औरंगाबाद, लातूर, अहमदनगर, परभणी आदी ठिकाणी गाड्या सोडण्यात आल्या. रक्षाबंधनानिमित्ताने पुणे एसटी विभागाच्या वतीने अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. अतिरिक्त गाड्यांमुळे सुमारे तीस हजार प्रवाशांची सोय झाली, असे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.