पुणे - विधानसभा निवडणुकीत १० नोव्हेंबरअखेर कोल्हापूर परिक्षेत्रात १९ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात सहा कोटी ६४ लाखांची रोकड, दोन कोटी ८३ लाखांची अवैध दारू, २२ लाख रुपयांचा ११३ किलो गांजा, एक कोटी ८७ लाख रुपये किमतीचा गुटखा, साडेसात कोटींचे ९ किलो सोने आणि ६० किलो चांदीचा समावेश आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.