पुणे जिल्ह्यात मंगळवारी १,९०६ नवे कोरोना रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) दिवसात १ हजार ९०६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात ४ हजार ९१ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Corona Patient
Corona PatientSakal
Updated on
Summary

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) दिवसात १ हजार ९०६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात ४ हजार ९१ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पुणे - जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) दिवसात १ हजार ९०६ नवे कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात ४ हजार ९१ जण कोरोनामुक्त (Corona Free) झाले असून अन्य १२ जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. जिल्ह्यातील दिवसातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ९६४ रुग्ण आहेत. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली आहे.

मंगळवारी शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ५४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३१६, नगरपालिका हद्दीत ५६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील पाच, पिंपरी चिंचवडमधील चार, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक मृत्यू आहे. दिवसभरात नगरपालिका हद्दीत कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

Corona Patient
PBA: अध्यक्षपदासाठी ॲड. थोरवे आणि ॲड. झंजाड यांच्यात लढत

जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार ७५ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १ हजार १२५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६७३, नगरपालिका हद्दीतील १७८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४० जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी २३ हजार ६०३ झाली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २ हजार १९७ ने कमी झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून १ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित २१ हजार ९५० जण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.