Pune Accident Case : पुण्यात सात दिवसांत 20 अपघात; दहा जणांचा बळी, तर दहा जण जखमी

पुणे : शहरात मागील सात दिवसांत विविध ठिकाणी २० अपघाताच्या (Pune Accident) घटना घडल्या.
Pune Accident Case
Pune Accident Case esakal
Updated on
Summary

शहरात १८ मे ते २४ मे या कालावधीत विविध पोलिस (Police) ठाण्यांमध्ये २० अपघाताचे गुन्हे दाखल झाले आहेत.

पुणे : शहरात मागील सात दिवसांत विविध ठिकाणी २० अपघाताच्या (Pune Accident) घटना घडल्या. या वेगवेगळ्या अपघातांमध्ये भरधाव वाहनांच्या धडकेने दहा जणांचा बळी गेला. तर, अन्य दहाजण जखमी झाले आहेत. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने आणि वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाताच्या घटना होत आहेत.

शहरात १८ मे ते २४ मे या कालावधीत विविध पोलिस (Police) ठाण्यांमध्ये २० अपघाताचे गुन्हे दाखल झाले आहेत. मागील शनिवारी, १८ मे रोजी एनडी रस्त्यावरील कुडजे गावाजवळ विजेच्या खांबाला धडकून बावधनमधील २३ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर हडपसर येथील मांजरी फार्म परिसरात दारूच्या नशेत दुचाकीने धडक दिल्यामुळे एका पादचारी जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला.

Pune Accident Case
Kalimata Temple : कालिमातेच्या अंगावरील तब्बल 12 तोळे दागिन्यांवर सुरक्षारक्षकाचा डल्ला; तीन दिवसांपूर्वी प्लॅन आखला अन्..

कोलवडी गावाजवळ मोटारीने दुचाकीला धडक दिल्यामुळे तरुण जखमी झाला. वानवडी येथील जगताप चौकात स्कोडा गाडीने धडक दिल्यामुळे एक तरुण जखमी झाला. रविवारी, १९ मे रोजी विश्रांतवाडी चतु:शृंगी, येरवडा आणि लोणी काळभोर परिसर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कल्याणीनगर जंक्शन (Kalyani Nagar Junction) परिसरात भरधाव पोर्शे गाडीने धडक दिल्यामुळे संगणक अभियंता तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.

तर, लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी, २० मे रोजी शिवाजीनगर येथील वाकडेवाडी परिसरात भरधाव रिक्षाने धडक दिल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तर हडपसरजवळ फुरसुंगी परिसरात भरधाव पीएमपी बसच्या धडकेने ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना घडली.

Pune Accident Case
'सुरेंद्रकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल यांनी धमकावून चालकाचा फोन काढून घेतला'; कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट!

मंगळवारी, २१ मे रोजी सोमवार पेठेत अज्ञात मोटारीने पाठीमागून धडक दिल्यामुळे ५५ वर्षीय महिला जखमी झाली. सिंहगड रस्त्यावरील धायरीजवळ रिक्षाच्या धडकेने एक महिला आणि तिचा मुलगा जखमी झाला. तर येरवड्यातील सादलबाबा दर्गा चौकात बुलेटने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या फॉर्च्यूनरला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

बुधवारी, २२ मे रोजी कोथरूड परिसरातील चांदणी चौकात भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी, २३ मे रोजी सदाशिव पेठेत अज्ञात वाहनाच्या धडकेने महिला जखमी झाली. दस्तूर शाळेजवळ टँकरला ओव्हरटेक करताना दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मगरपट्टा परिसरात भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे सहा वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना घडली.

Pune Accident Case
डोंबिवली MIDC स्फोटात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू; चार तास शोध मोहीम बंद, नातेवाईकांनी घातला गोंधळ

शुक्रवारी, २४ मे रोजी बाजीराव रस्त्यावरील गणराज हॉटेलसमोर दुचाकीने पीएमपीला धडक दिल्यामुळे तरुण जखमी झाला. लोणीकंद परिसरात नगर रस्त्यावरील पेरणे टोल नाक्याजवळ अज्ञात मोटरचालकाने पाठीमागून धडक दिल्यामुळे एका ३५ वर्षीय तरुणाचा बळी गेला. तर लोणी काळभोर येथील कुंजीरवाडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेने ४६ वर्षीय महिला जखमी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.