कोरोनाविरोधात लढा देऊन मेट्रोचे 'ते' मजूर पुन्हा कामावर

कोरोनाविरोधात लढा देऊन मेट्रोचे 'ते' मजूर पुन्हा कामावर
Updated on

पुणे : शहरातील मेट्रो प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांपैकी 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच हे कामगार आता पुन्हा कामावरही रुजू झाले आहेत. त्यामुळे मेट्रोचे 16 लेबर कॅम्प आता कोरोनामुक्त झाले आहेत.

मेट्रोचे पुण्यात पिंपरी चिंचवड-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मार्गावर दोन प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरीत मेट्रोचे सुमारे 2600 कामगार काम करतात. येरवडा, वनाज, कासारवाडी, वाघोली, रेंजहिल्स, किवळे आदी 16 ठिकाणी मेट्रोचे लेबर कॅम्प आहेत. त्यातील येरवडा येथील लेबर कॅम्पमध्ये सुमारे 20 मेच्या सुमारास काही मजूर आजारी पडत गेले. खबरदारीचा उपाय म्हणून कॅम्पमधील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील मजुरांचीही तपासणी करण्यात आली. तेव्हा ते सुमारे 20 मजूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत आढळून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेशी संपर्क साधला. तेव्हा त्या मजुरांना कमला नेहरू रुग्णालय, नायडू रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांना गेल्या आठवड्यात परत पाठविण्यात आले. त्यातील 12 जणांनी  5 दिवस विश्रांती घेतली आणि ते पुन्हा कामावरही रुजू झाले आहेत, अशी माहिती महामेट्रोचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुक्त झालेले 20 कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील आहेत. सुमारे 25 ते 45 वयोगटातील ते आहेत. मेट्रोच्या 2600 मजुरांपैकी 880 मजूर सध्या कामावर आहेत. त्यांच्या मार्फत मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर काम सुरू आहे. तसेच भुयारी मेट्रोचेही काम सुरू आहे. मेट्रोच्या सर्व लेबर कॅंपमध्ये महामेट्रोतर्फे अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. तसेच तेथे डॉक्टरही तैनात करण्यात आले आहेत. मजुरांचे त्यांच्या-त्यांच्या राज्यानुसार ग्रूप आहेत. तेथे ते एकत्र स्वयंपाक करतात. त्यांच्या मनोरंजनासाठीही टिव्ही, कॅरम आदी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मजुरांची टंचाई दूर करण्यासाठी महामेट्रोने पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश येथील राज्य सरकारशी संपर्क साधला आहे. पुण्यात परतण्यास इच्छूक मजुरांना लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार लवकरच हे मजूर पुण्यात परततील, असा अंदाज सोनवणे यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.