Pune Crime : भाजपच्या माजी नगरसेवकांसह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात बेकायदा जमाव जमवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस शिपाई अभिजित वालगुडे यांनी याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आचारसंहितेचा भंग करणे, तसेच बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी शिळीमकर, वाबळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्मावती परिसरात मतदारांना पैसे वाटपाचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले होते. पैसे वाटणाऱ्यांवर कारवार्इ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. रविवारी (ता.१२) केलेल्या या ठिय्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता.

धंगेकर यांनी आंदोलन केल्यानंतर काही वेळाने भाजपचे माजी नगरसेवक शिळीमकर, वाबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहकारनगर पोलिस ठाण्यात गेले. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.