Water Discharge : खडकवासला धरणातून २१४० क्युसेकचा विसर्ग सुरु

खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर शुक्रवारी रात्री धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली.
Water Discharge in Khadakwasala Dam
Water Discharge in Khadakwasala DamSakal
Updated on

खडकवासला - खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर शुक्रवारी रात्री धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली. शनिवारी रात्री १० वाजता धरणातून २१४० क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले जात आहे.

खडकवासला धरण साखळीतील वरसगाव, पानशेत, टेमघर व खडकवासला या चार ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यापासून चांगला पाऊस सुरु आहे. परिणामी धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढली. खडकवासला धरण शुक्रवारी रात्री ११ वाजता १०० टक्के भरले.

त्यानंतर धरणातून ८५६ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली. त्यानंतर रात्री बारा वाजता १७१२ क्युसेक, मध्यरात्री तीन वाजता २५६८ क्युसेकने पाणी सोडले जात होते. शनिवारी दिवसभर हा विसर्ग सुरू होता. परंतु शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चार ही धरणात पाऊस झालाच नाही.

आवक थोडी कमी झाल्याने धरणातील विसर्ग पाच वाजता कमी केला. त्यावेळी २५६८ क्युसेकहून २१४० क्युसेक पर्यंत कमी केला. चार ही धरणात मिळून २८.३८ टीएमसी म्हणजे ९७.३६ टक्के पाणीसाठा आहे.

‘वरसगाव, पानशेत, व खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर टेमघर धरणात २.९४ टीएमसी म्हणजे ७९.२१ टक्के धरण भरले आहे. वरसगाव धरणातून ४५० क्युसेकने पाणी मोसे नदीत सोडले. वीज निर्मितीसाठी ६०० क्युसेक सुरु आहे. असे दोन्ही मिळून १०५० क्युसेक पाणी थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

यामुळे पावसाचा जोर पाहून खडकवासला धरणातील विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. म्हणून नदी काठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी.’ असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.