आंबेगाव तालुक्यातील या गावांसाठी 22 कोटींची पाणी योजना 

water
water
Updated on

सातगाव पठार (पुणे) : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासाठी 22 कोटी रुपयांची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे सातगाव पठार भागातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.  

पेठ (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत या योजनेच्या आढाव्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या योजनेबाबत जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांनी माहिती दिली. या योजनेअंतर्गत सातगाव पठार भागातील सातही गावांना घोड नदीपात्रातून बंद पाईपलाईनद्वारे शुध्द पाणी पुरवठा केला जाणार आहे. या योजनेद्वारे घोड नदीपात्रातून पाईपलाईनद्वारे कुरवंडी येथील टाकीत पाणी सोडले जाईल. याच ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून शुद्धीकरण केलेले पाणी सातही गावांना पाईपलाईनद्वारे दिले जाईल. कुरवंडी येथे या योजनेसाठी आवश्यक असणारी 20 गुंठे जागा कुरवंडीचे माजी सरपंच विशाल तोत्रे यांनी दिली आहे.

या योजनेसाठी या बैठकीमध्ये पाणी पुरवठा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राम तोडकर,  उपाध्यक्षपदी कुरवंडीचे माजी सरपंच विशाल तोत्रे, सचिवपदी पेठ येथील ग्रामविकास अधिकारी एम. जे. चौगुले, सहसचिवपदी ग्रामसेवक अनिल टेमकर यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्या शीतल तोडकर, पारगावतर्फे खेडचे सरपंच सचिन पानसरे, भावडीचे सरपंच महेश नवले, माजी उपसरपंच संतोष धुमाळ, जितेंद्र तोत्रे, कुरवंडीचे उपसरपंच विकास बारवे, पेठ ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी सागर कांबळे, पेठचे गाव कामगार तलाठी हेमंत भागवत, अशोक बाजारे, अशोक राक्षे, रवींद्र तोत्रे, दतात्रेय तोत्रे, दिलिप पवळे आणि सातगाव पठार भागातील सर्व गावांचे ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते.

सातगाव पठार भागात उन्हाळ्यात दरवर्षीच पाण्याचे दुर्भिष्य जाणवते. हि बाब लक्षात घेता राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रादेशीक नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे प्रत्येक गावास शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहील व त्यांची पाण्याची गैरसोय देखील दूर होण्यास मदत होणार आहे. 
 - राम तोडकर, अध्यक्ष, सातगाव पठार प्रादेशीक नळ पाणी पुरवठा समिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.