स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांची कसून झाडाझडती

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 23 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक
Police
PoliceSakal
Updated on

पुणे : पुणे पोलिसांची (police) गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांकडून कडून स्वातंत्र्य (Independent) दिनाच्या पार्श्वभुमीवर शहरात शुक्रवारी (Friday) रात्री (Night) अचानक कोम्बिंग ऑपरेशन (Opration) राबवून सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये पोलिसांच्या Police अभिलेखावरील अडीच हजार सराईत गुन्हेगारांची तपासणी केली, त्यामध्ये 829 सराईत गुन्हेगार (Criminal) पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी या कारवाईमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या 23 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 17 कोयते, तीन तलवारी व चाकू जप्त केला.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर शहरात कोम्बींग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्यासह सर्व परिमंडळाच्या पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. या पथकांनी शुक्रवारी रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 23 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच विविध गुन्ह्यात फरारी असलेल्या सहा आरोपींनाही पोलिसांनी पकडले. या मोहिमेत 287 आरोपींच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरातली विविध पथकांनी चारशे लॉज, हॉटेल्सची तपासणी केली.

Police
प्रांतीय भाषांवर हिंदी लादणार नाही - अमित शहा

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने कारवाई करतानाच दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, पाच काडतुसे व इतर ऐवज असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये तडीपार आदेशाचा भंग करून शहरात पुन्हा वास्तव्य करणाऱ्या 13 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी दहा तडीपार गुन्हे शाखा व तीन तडीपार स्थानिक पोलिसांनी पकडले आहेत.

Police
"राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती नाही" - रामदास आठवले

याबरोबरच पोलिसांनी शहरातील लॉजेस, हॉटेल, रेल्वे स्टेशन, बस स्थानके व संशयित व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()