पुणे शहरातील कोथरूड परिसरात डंपरने एका तरुणीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोथरूड स्टँडसमोर रस्ता ओलांडत असताना मिक्सर डंपरचे चाक तिच्या अंगावरून गेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेनंतर रस्त्यावर मृतदेहाचा चिखल झाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती सुरेश मनवाने वय 23 रा. एरंडे होस्टेल भेलके नगर कोथरूड ही कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत असताना डंपरची धडक लागून जागीच मयत झाली आहे. तिचे वडील सुरेश मनवाणी यांना कळवले असून डंपर ताब्यात घेतला आहे.
पुणे ते नगर रस्त्यावर डपंरच्या धडकेने मृत्यूची मालिका सुरू असतानाच आता कोथरूडमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. कोथरूडमधील पीएमपीएल बसस्थानकासमोर दुभाजकामधून रस्ता क्रॉस करताना डंपरचा (MH 12WJ6282)धडकेने युवतीची मृत्यू झाला आहे.
अलंकार पोलिस दिलेल्या माहितीनुसार, आरती ही सकाळी पाऊणे अकरा वाजता दामोदर व्हिला सोसायटीच्या बाजूने कोथरूडमधील बसस्थानककडे येत असताना ती दुभाजकावर चढून रस्ता ओलांडत होती. यादरम्यान कोकण एक्स्प्रेस हॉटेलकडून आलेल्या डंपरची तीला जोरदार धडक बसल्याने तीचा जागेवर मृत्यू झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या सलीम शेख यांनी सांगितले की, दुर्घटना घडली तेव्हा आरती ही दुभाजकामधून रस्ता ओलांडत असताना ती फोन वर बोलत होती. याच दुभाजकमधून नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी काही अंतरावर सात फुटाची जागाही ठेवली आहे. पण आरती ही दुभाजकामधील झाडांमधून रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना तीचा अपघात झाला.
आरती माॉडलिंग क्षेत्रात करिअर करण्याच्या विचारात होती तर, कोथरूडमधील एका डिजीटल मार्केटिंग कपंनीमध्ये पार्ट टाइम जॉब करत होती, असे तिच्या एका मैत्रिणीने सांगितले आहे.
डहाणूकर कॉलणीकडून कोथरूडकडे येताना नागरिक रस्ता ओलांडताना नेमून दिलेल्या जागेवरवरुन रस्ता ओलांडत नाहीत तर शॉर्टकट म्हणून झाडामधून रस्ता ओलांडतातय
कोकण एक्स्प्रेस चौक ते कर्वे चौक मधील दुभाजकामधील झाडांची तातडीने छाटणी करावी
हा रस्ता काही अंशी वळणावर असल्याने दुभाजकामधून जाताना वाहन चालकाना नागरिक दिसत नाही.
तसेच रस्ता क्रॉस करताना दुभाजक ब्रेक असणाऱ्या ठिकाणी गतीरोधक आवश्यक आहे.
मंत्री पार्क करुन कोथरूड बसस्थानक धोकादायक वळणावर उपाययोजना आवश्यक आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.