पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.८) दिवसभरात २३९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट २६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) मंगळवारी (ता.८) दिवसभरात २३९ नवीन कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. याउलट २६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या शून्य मृत्यूची (Death) नोंद झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना रुग्ण आकडेवारी अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील दिवसातील नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील १३७ नवे रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये ३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २८, नगरपालिका हद्दीत १७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २५ नवे रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी दिवसभरातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १२० रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील ४१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८२, नगरपालिका हद्दीतील १४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील अकरा जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार १५८ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये १४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार १८ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ६६७ रुग्ण आहेत. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी सध्या ५६ रुग्णांवर उपचार सुरु असून ६११ जण गृह विलगीकरणात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण १८७ सक्रिय रुग्ण असून, यापैकी ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित १५० जण गृह विलगीकरणात आहेत. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १९१, नगरपालिका हद्दीत ६० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५३ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.