पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील १०८० रुग्णांपैकी तब्बल २५० रुग्णांना कोरोनाच लागण झाली आहे. त्यापैकी दीडशेजण बरे झाले असून शंभर जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण इतर रुग्णांना होऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. रुग्णांचे तत्काळ लसीकरण करण्याची मागणी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे केल्याची माहिती अधिक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी दिली आहे.
येरवडा मनोरुग्णालय अडीच हजार रूग्ण क्षमतेचे आहे. मात्र कोरोनाच्या काळात रुग्णालयता सध्या ५४९ पुरूष तर ४६९ महिला रुग्ण आहेत. रुग्णालयात पुरूष विभागात नऊ तर महिला विभागात सात मोठे कक्ष आहेत. यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांचा उंच कक्ष, अशक्त रुग्णांचा कक्ष अशा विविध विभागांचा समावेश आहे.
मनोरुग्णालयातील परिचारिकांपासून ते डॉक्टरांचे लसीकरण झाले आहे. मात्र रुग्णांचे लसीकरण झाले नाही. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गाच्या काळात रुग्णालय प्रशासनाने मोठी दक्षता घेतली होती. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यात त्यांना यश आले होते. मात्र यावर्षी कोरोनाने रुग्णालयात थैमान घातल्याचे चित्र आहे. रुग्णालयात कोव्हिड कक्ष आहे. तरी सुद्धा रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील डॉक्टर व परिचारिकांना तारेवरच कसरत करावी ला
मनोरुग्णालयातील रुग्ण स्वच्छते बाबतीत स्वत:काळजी घेत नाहीत. त्यांची काळजी परिचारक किंवा परिचारिका घेतात. तसेच सामाजिक अंतर किंवा तोंडाला मास्क लावण्याचे भान त्यांना नसते त्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते. यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर रुग्णांचे लसीकरण हा अेकमेव पर्याय असल्याचे डॉ. फडणीस यांनी सांगितले.
‘‘ येरवडा मनोरुग्णालयातील २५० रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी दीडशेजण बरे झाले असून शंभरजणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.’’
- डॉ. अभिजीत फडणीस, अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.