वेल्हे, (पुणे) : शिवरायांचा तोरणा मुंबई येथील २६ दृष्टीहिन मुलांनी प्रजाकसत्ताक दिनी सर करुन अनुभवला. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती नयन फाऊंडेशनचे अध्यक्ष पोन्नलगर देवेंद्र व सचिव शार्दुल म्हाडगुत यांनी दिली.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसवलेला तोरणा किल्ला म्हणजे गरुडाचे घरटे हा किल्ला सर करण्याची इच्छा अनेकांची असते काहींची पुर्ण होते तर काहींची नाही. परंतु मुंबई येथील अंध मुलांनी तोरणा किल्ला अनुभवण्याची इच्छा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मुंबई येथे काही दिवसांपुर्वी व्यक्त केली. यावर सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील त्यांच्या खाजगी स्वीय साहय्यक रश्मी कामतेकर यांच्याशी नयन फाऊंडेशच्या पदाधिका-यांचा संपर्क करुन दिला होता.
यानुसार नयन फाऊंडेशच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तोरणा किल्ल्यावर ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकमध्ये मुंबईतील २६ अंध मुलांनी सहभाग घेतला सकाळी नऊ वाजता किल्ले चढण्यासाठी सुरवात केली या मुलांनी अपेक्षित वेळेपेक्षा अवघ्या साडेतीन तासात नयन फाऊंडेशच्या १२ स्वयंसेवकांच्या मदतीने किल्ले तोरणा सर केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस आनंद देशमाने यांच्या सहकार्याने राष्ट्रवादीच्या माजी अध्यक्ष तानाजी मांगडे यांनी त्यांचे स्वताचे मंगल कार्यालय उपलब्ध करुन देत करंजावणे येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णा शिंदे यांच्या मदतीने फाऊंडेशच्या सदस्य व अंध मुलांची चहा नाष्टा जेवणाची सोय करण्यात आली असल्याने यावेळी फाऊंडेशनच्या सदस्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले.
यावेळी तोरणा किल्ला सर केलेली मुंबई येथील दृष्टीहीन सविता गव्हारे म्हणाली, ''नयन फाऊंडेशनच्या वतीने गेली अनेक वर्ष विविध ठिकाणचे ट्रेकचे आयोजन केले जाते. परंतु छत्रपतींचा तोरणा किल्ला ट्रेक करणे खुप अवघड होता. मनात शंका होती मी वर चढु शकेल कि नाही, परंतु सोबतच्या स्वयंसेवकमुळे मला किल्ला अनुभवता आला.''
नयन फांऊडेशच्या वतीने गेली अनेक वर्षापासून विविध ठिकाणचे ट्रेकचे आयोजन करण्यात येते तर मुंबई येथे दुष्टीहिन मुंलींचे गोविंदा पथक तयार केले असून, या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा व छत्रपंतींचे किल्ले अनुभवता यावे यामागचा हेतू असल्याचा फाऊंडेशचे सचिव शार्दुल म्हातगुड यांनी 'सकाळ 'शी बोलताना सांगितले.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.