केडगावमध्ये ऑक्सिजन अभावी 3 जणांचा मृत्यू

death body.jpg
death body.jpgई सकाळ
Updated on

केडगाव : येथील मोहन जनरल हॅास्पिटलमधील कोरोना संसर्ग असलेल्या तीन रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी घडली. त्यामुळे नातेवाईकांनी संतप्त होऊन मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने एकच खळबळ उडाली.

मोहन हॅास्पिटलमध्ये यवत, ताम्हणवाडी ( ता.दौंड ) व कर्जत ( जि.नगर ) येथील तीन जणांचा मृत्यू झाला. यात एक महिला व एका तरूणाचा समावेश आहे. येथील डॅाक्टर धीरेंद्र मोहन यांनी दुपारीच हॅास्पिटलमधील ऑक्सिजन संपत आल्याचे प्रशासनास सांगितले होते. सायंकाळी या हॅास्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध झाला होता. रूग्णांच्या नातेवाईकांनी या घटनेचा ठपका हॅास्पिटलवर ठेवत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

हॅास्पिटलच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने परिस्थिती तणावपुर्ण बनली. ही घटना समजताच तहसीलदार संजय पाटील, आरोग्य अधिकारी शशिकांत इरवाडकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील घटनास्थळी हजर झाले. संजय पाटील व भाऊसाहेब पाटील यांनी चौकशी करण्यात येऊन दोषी आढळले तर कारवाई केली जाईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले. तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले.

death body.jpg
सुख म्हणजे नक्की काय असते? ना ताप, ना खोकला अन् चव असते

नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्हाधिकारी व प्रांत यांच्यापर्यंत हा विषय गेला. यावेळी भाजपचे तानाजी दिवेकर यांनी डॅाक्टर व प्रशासनास धारेवर धरले. डॅा. धिरेंद्र मोहन म्हणाले, ''ऑक्सिजनसाठी अनेकदा आग्रही मागणी करून सुद्धा तो मिळत नाही, असे असेल तर हॅास्पिटल कशी चालवणार? रूग्णांची आजची स्थिती गंभीर होती.

दिवेकर म्हणाले, ''हॅास्पिटलच्या अवास्तव बिलाबाबत अनेक तक्रारी असून त्याची चौकशी झाली पाहिजे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()