Pune : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून ३०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात रक्कम जमा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली
300 rupees per metric ton from Bhimashankar Cooperative Sugar Factory to bank account of sugarcane growers
300 rupees per metric ton from Bhimashankar Cooperative Sugar Factory to bank account of sugarcane growersSakal
Updated on

पारगाव : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे व बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रमात दिलेल्या शब्दाप्रमाणे अंतिम हप्ता रक्कम ३०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे एकूण रक्कम २७ कोटी ५० लाख काल बुधवार (दि.२५) ला ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.

त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण ९ लाख १९ हजार ९८३ मेट्रिक टनासाठी कारखान्याने यापुर्वी एफ.आर.पी. नुसार प्रती मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केलेली आहे.

अंतिम दर ३,१०० रुपये प्रती मेट्रिक टन जाहीर केल्याप्रमाणे अंतिम हप्ता ३५० रुपयांमधून भाग विकास निधी ५० रुपये प्रती मेट्रिक टना मागे वजा जाता उर्वरित ३०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम २७ कोटी ५० लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नसतानाही चांगला ऊस दर दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत दिलेलीच आहे. याशिवाय एफ.आर.पी. पेक्षा वाढीव रक्कम ३५० रुपये प्रती मेट्रिक टन अंतिम हप्त्याचे स्वरुपात ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलेली आहे. गाळप हंगाम २०२३-२४ करीता उपलब्ध ऊस गाळपाची तयारी झालेली असून कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.