MP Dr. Amol Kolhe : शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी मंजूर

शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी मंजूर झाले असल्याची माहीती डॉ. अमोल कोल्हे यांनी राजुरी या ठिकाणी दिली.
MP Dr. Amol Kolhe
MP Dr. Amol Kolhesakal
Updated on

- राजेश कणसे

आळेफाटा - शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी मंजूर झाले असल्याची माहीती डॉ. अमोल कोल्हे यांनी राजुरी या ठिकाणी दिली.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातुन व आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्यातून मंजुर झालेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन ४ कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी बोरी बुद्रुक ते राजुरी उंचखडक या रस्त्यासाठी मंजुर झाले असुन, या कामाच्या भुमीपुजन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, माजी सभापती दिपक औटी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उंचखडक गावच्या सरपंच सुवर्णा कणसे, उपसरपंच माऊली शेळके, ॲड. विजय कु-हाडे, मोणिका वाळुंज, बाळासाहेब औटी, वल्लभ शेळके, शाम माळी, गणपत कवडे, एम. डी. घंगाळे, बाळासाहेब हाडवळे, लक्ष्मण घंगाळे, संजय हाडवळे, प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एस. कुलकर्णी, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली असुन, नगर-कल्याण रेल्वे महामार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

यावेळी आमदार बेनके म्हणाले की, चिल्हेवाडी बंद पाईप लाईनसाठी शंभर कोटींची निधी मंजुर झाला असुन, राहीलेले काम लवकरात लवकर पुर्ण केले जाईल. तसेच आणे पठार भागावरील चार गावे व राजुरी व उंचखडक या गावांसाठी चारा डेपो चालु करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला असुन, तोपर्यंत लोकसहभागातुन जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन यावेळी दिले. तसेच राजुरी गावातील सभागृह, रस्ते यांसाठी ३ कोटी यांसाठी निधी मंजुर झाला असल्याचे सांगितले.

माजी सभापती औटी यांनी आपल्या भाषणात ग्रामस्थांच्या वतीने चालु वर्षी पाऊस अतिशय कमी झाला असुन पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असुन, पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला पाणी सोडावे. तसेच राजुरी गावात चारा डेपो चालु करावा अशी मागणी यावेळी केली.

दरम्यान ५ कोटी ६६ लक्ष रुपयांचा निधी आळे भटकळवाडी, वडगाव कांदळी ते हिवरे तर्फे नारायणगाव या रस्त्यासाठी मंजुर झाले असुन, या कामाचे भुमीपुजन भटकळवाडी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रिया हाडवळे यांणी केले तर सुत्रसंचलन मोहन हाडवळे यांनी केले व आभार जयसिंग औटी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.